शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभर आता मॉन्सून ब्रेक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST

पुणे : मॉन्सून वारे कमकुवत असल्याने पुढील ७ दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या ...

पुणे : मॉन्सून वारे कमकुवत असल्याने पुढील ७ दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा मॉन्सूनने नेहमीपेक्षा अधिक वेगाने वाटचाल करीत देशातील बहुतांश भागात आगमन केले. राजस्थानचा काही भाग, दिल्ली, हरयाना आणि पंजाबच्या काही भागात अजून मॉन्सून पोहचलेला नाही. सध्या मॉन्सूनची सीमा रेषा बारमेर, भिडवाडा, धुलपूर, अलिगड, मिरत, अंबाला आणि अमृतसर अशी आहे. १९ जूनपासून मॉन्सूनची वाटचाल थांबलेली आहे़.

सध्या मॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिम भागातील वाऱ्यांची दिशा लक्षात घेता उत्तर पश्चिम भारत, मध्य भारतात २४ ते २६ जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नाही. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील ७ दिवस मॉन्सून वारे कमकुवत राहणार आहे.

बंगालच्या उपसागरात ३० जूनपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसून येत नाही. त्यामुळे देशातील मध्य भारत, पश्चिम भारत, दक्षिणेकडील राज्यात मोठ्या पावसाची शक्यता पुढील ७ दिवसात दिसून येत नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात केवळ किनवट येथे १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

चौकट

राज्यात पुढील तीन दिवस कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.