शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिर्सुफळ गावातील माकडांची होतेय उपासमार

By admin | Updated: February 13, 2017 01:31 IST

माकडांना देव मानणाऱ्या शिर्सुफळ (ता. बारामती) गावातील माकडांची संख्या कमी होत आहे. शिरसाई देवी परिसरात आणि संपूर्ण गावात

महेंद्र कांबळे / बारामतीमाकडांना देव मानणाऱ्या शिर्सुफळ (ता. बारामती) गावातील माकडांची संख्या कमी होत आहे. शिरसाई देवी परिसरात आणि संपूर्ण गावात या माकडांचा वावर असतो. या माकडांसाठी इंग्रजांनी खास ‘माकड इनाम’ म्हणून शेतजमीन इनामी दिली आहे. मात्र या माकडांच्या मालकीच्या जमिनीत पीक घेतले जात नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. अलीकडच्या काळात माकडांची संख्या घटत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ग्रामस्थांचा समावेश करून एकाच ट्रस्टच्या माध्यमातून देवस्थान आणि माकड इनामाच्या शेतजमिनीची देखभाल करावी, यासाठी ग्रामस्थांचा आग्रह आहे. ग्रामस्थांच्या देखरेखीखाली शिरसाई मंदिराच्या ट्रस्टचे दैनंदिन कामकाज चालते. इंग्रजांनी सनदेच्या माध्यमातून मंदिर परिसरातील माकडांची उपासमार होऊ नये, यासाठी शेतजमीन दिली आहे. मंदिराच्या ट्रस्टमध्ये ग्रामस्थांचा सहभाग आहे. तर शेतजमिनीच्या ट्रस्टमध्ये एकाच कुटुंबाचा समावेश आहे. त्याला ग्रामस्थांनी आव्हान दिले आहे. धर्मादाय आयुक्तांकडे याबाबतचे प्रकरण प्रलंबित आहे. जुन्या ट्रस्टमध्ये एकाच कुटुंबाचा समावेश...शिरसाई देवस्थान हे महाराष्ट्रातील पुरातन व नावाजलेले मंदिर आहे. शिरसाई देवस्थानच्या जमिनीचा ट्रस्ट हा सन १९५२मध्ये गुरव कुटुंबातील घरातील व्यक्तींचा तयार करण्यात आला. १९८०मध्ये जुन्याच ट्रस्टमध्ये मंदिराचा समावेश करण्यात आला. हा ट्रस्ट करताना तो वंशपरंपरागत करण्यात आला आहे. त्यामध्ये घरातील व्यक्तींचाच समावेश आहे. ट्रस्ट करत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. गावकऱ्यांनी त्याला विरोध केला. गावात तीन जमिनी इनाम ब्रिटिशकाळात देण्यात आल्या आहेत. या जमिनीच्या ट्रस्टबाबत ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. त्यावर निर्णय प्रलंबित आहे. ग्रामस्थ आणि मंदिराची देखभाल करणारे कुटुंब माकडांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवतात. या मंदिरात हजारो भाविक सातत्याने येत असतात. त्यामुळे त्यांच्याकडूनदेखील माकडांना खाद्य पुरविले जाते. तसेच, यात्रा, उत्सवकाळात ग्रामस्थांकडूनच मंदिराची देखभाल केली जाते. मात्र, ट्रस्टकडून धर्मादाय आयुक्तांकडे चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. विशेष म्हणजे ट्रस्टच्या विश्वस्तांकडून ग्रामस्थांना पूजेचा अधिकार कधीही देण्यात आला नाही. सध्या ट्रस्टवर जे विश्वस्त आहेत, ते पुणे, सासवड, जेजुरी, बारामती, दौंड या ठिकाणी वास्तव्याला आहेत. मुख्य विश्वस्त विनोद महादेव शिंदे (गुरव) हे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात. त्यामुळे त्यांचा दैनंदिन देवस्थानशी संपर्क येत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.