शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

‘धर्मादाय’मध्येही पैशांचा धर्म

By admin | Updated: December 15, 2014 01:36 IST

‘साहेब, आम्ही पाच-सहा मित्र आहोत. झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी काम करतो. आम्हाला सामाजिक संस्थेची नोंदणी करायची आहे.

श्रीकिशन काळे, पुणे‘साहेब, आम्ही पाच-सहा मित्र आहोत. झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी काम करतो. आम्हाला सामाजिक संस्थेची नोंदणी करायची आहे. काय करावे लागेल?’ ‘केवळ पाच हजार रुपये द्या, सर्व काम होईल. एक फॉर्म भरून द्या व फोटो आयडीची झेरॉक्स आणा. सर्व काम करून देऊ..!’ असा संवाद धर्मादाय आयुक्त कार्यालयात गेल्यानंतर ऐकायला मिळाला. त्यामुळे या कार्यालयातही एजंटगिरीशिवाय काहीच होऊ शकत नसल्याचे आढळून आले.एखादी सामाजिक संस्था सुरू करायची असेल, तर त्यासाठी त्याची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात करावी लागते. मंदिर, मठ, गणेश मंडळ आदी संस्थांसाठी ट्रस्ट स्थापन करावा लागतो. त्यानंतर धर्मादाय कार्यालयात त्याची रीतसर नोंद करून घ्यावी लागते. या कार्यालयात दररोज दहा ते पंधरा लोक संस्था नोंदणी करण्यासाठी येत असतात. पुणे स्टेशनजवळील वाडिया महाविद्यालयासमोर हे कार्यालय आहे. कार्यालयात गेल्यानंतर चकाचक इमारत पाहून नवीन माणूस हरखून जातो. नेमकी माहिती कोणाला विचारायची, तेच कळत नाही, त्यामुळे काही वेळ तरी कार्यालयात काय चालले आहे, ते पाहावे लागते. सर्वत्र वकिलांची ये-जा सुरू असते. आपण न्यायालयात तर नाही ना आलो, असेच तेथील परिस्थिती पाहून वाटते. कार्यालयात नेमकी माहिती कोणाकडूनच मिळत नाही, त्यामुळे नागरिक हताश होतात. दरम्यान, एजंट मात्र अशा व्यक्तींना ओळखून त्यांना आपल्या जाळ्यात खेचतात. दरम्यान, सामाजिक संस्थेची नोंद करण्यासाठी भला मोठा फॉर्म आहे. तो फॉर्म पाहून नागरिकांना काहीच कळत नाही. एजंट मग ‘अहो, तुम्ही फक्त पाच हजार रुपयेद्या, बाकी आम्ही सर्व काम करून देतो,’ असे सांगतात. कार्यालयात नोंदणीसाठीचा फॉर्म १० रुपयांना मिळतो; परंतु बाहेर एजंट तोच फॉर्म ३० रुपयांना देतात. मोठा फॉर्म भरायचा नसेल तर मग एजंट केवळ एक फॉर्म देतात, त्यावर ते संस्थेची नोंदणी करून देतात. नियमानूसार केवळ दोनशे ते तीनशे रूपयांत सामाजिक संस्थेची नोंदणी होते. परंतु, त्यासाठी हजारो रूपये घेतले जात आहेत.