शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ॲपद्वारे स्वत: करू शकता कार्बन उत्सर्जन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:10 IST

तरूणीने बनवले ॲप : प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावशाली पाऊल श्रीकिशन काळे पुणे : आपण दररोज विनाकारण कार्बन तयार करतो ...

तरूणीने बनवले ॲप : प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावशाली पाऊल

श्रीकिशन काळे

पुणे : आपण दररोज विनाकारण कार्बन तयार करतो आणि तो हवेत जाऊन प्रदूषणात भर घालतो. पण आता आपण आपले कार्बन कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यासाठी एक मोफत ॲप पुण्यातील तरूणीने केले असून, ते डाऊनलोड केल्यास तुम्ही दररोज किती कार्बन कमी करू शकता, ते त्यात दिसून येईल. परिणामी प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होणार आहे. प्राची शेवगावकर या तरूणीने ‘cool and globe हे ॲप तयार केले आहे. प्ले स्टोअरमध्ये हे कोणालाही डाऊनलोड करता येईल आणि त्याचा वापर करता येईल.

प्राची या विषयी म्हणाली,‘‘ मी जागृती यात्रेत सहभागी झाले होते. तेव्हा सोनम वांगचूक यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाने मला प्रभावीत केले. त्यानंतर मी निसर्ग संवर्धनासाठी काही तरी करू शकेन का ? यावर विचार करू लागले. मग मी माझ्या बाबांना याविषयी विचारले. त्यांनी सोपा मार्ग सांगितला. तु स्वत: कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न कर. मग मी ठरवलं की, काय केले म्हणजे मी कार्बन उत्सर्जन कमी करू शकेन. मी जर स्वत:च्या वाहनापेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला, मांसाहार सोडला तर किती कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल. त्याबाबत मग मी आणि माझ्या बाबाने हे ॲप तयार केले. यातून सामान्य माणूस हवामान बदलावर स्वत:चे योगदान देऊ शकतो.’’

कसे थांबवाल कार्बन उत्सर्जन ?

जर मी दहा किलोमीटर वाहनाऐवजी सायकलने प्रवास केला, तर मी २.३ किलो कार्बन वातावरणात जाण्यापासून वाचविला. जर मी दोन तास टीव्ही पाहिला नाही, तर मी ०.१२ किलो कार्बन उत्सर्जन होण्यापासून वाचविले. मला मांसाहार आवडतो, पण महिनाभर मी ते खाल्ले नाही, तर महिन्याला २० किलो कार्बन उत्सर्जन थांबविले, असे प्राची म्हणाली.

अधिकाधिक वापर करावा

तीन वर्षे ‘cool and globe’ या ॲपवर काम केले. हा प्रकल्प पूर्ण झाला असला, तरी त्याचे काम आता सुरू होणार आहे. ज्यांना हवामान बदलावर काम करायचे आहे, त्यांनी याचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपले लहान-लहान बदलच हवामान बदलावर परिणामकारक ठरणार आहेत. नवीन वर्षापुर्वीच अँपद्वारे ५० टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे, असे प्राची म्हणाली.