चाकण : चाकण येथील पाहुण्यांच्या घरी लग्नसमारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेले ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक चहा पिण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर चक्क बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे. चाकण येथील सुनील जगताप (रा. आंबेडकरनगर, चाकण) यांच्या घरी लग्नसमारंभाच्या निमित्ताने शांताराम ओव्हाळ हे पत्नी व मुलांसमवेत आले होते. हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी ते घराबाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी परतलेच नाहीत. परिसरातील काही नागरिकांनी त्यांना पुन्हा पाहुण्यांच्या घरी जाण्याचा पत्ता विचारताना पाहिल्याचे सांगितले असून, नंतर मात्र ते आश्चर्यकारकरीत्या गायब झाले आहेत. नातेवाईक आणि पाहुण्यांनी सर्वत्र शोधूनही त्यांचा कोठेही काहीही थांगपत्ता न लागल्याने अखेर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. (वार्ताहर)
लग्नसमारंभासाठी आलेला इसम चाकणमधून बेपत्ता
By admin | Updated: May 20, 2014 04:43 IST