शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

मंत्र्यांच्या आश्वासनाला फासला हरताळ

By admin | Updated: January 13, 2017 03:40 IST

राजकीय पक्षांचा विरोध व आयुक्तांचा अट्टहास यामुळे बहुचर्चित झालेल्या २४ तास पाणी योजनेतील पाणी साठवण

पुणे : राजकीय पक्षांचा विरोध व आयुक्तांचा अट्टहास यामुळे बहुचर्चित झालेल्या २४ तास पाणी योजनेतील पाणी साठवण टाक्यांचे काम विधान परिषदेत मंत्र्यांनी दिलेल्या चौकशीच्या आश्वासनानंतरही सुरूच आहे. याबाबत पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अद्याप कसलेही आदेश आले नसल्याचे समजते.विधान परिषदेत या योजनेतील ८२ टाक्यांच्या निविदा प्रक्रियेबाबत आमदार अनंत गाडगीळ, अनिल भोसले यांनी प्रश्न उपस्थित केले होते. एका विशिष्ट कंपनीला काम मिळेल, यापद्धतीनेच निविदेची रचना करण्यात आली, टाक्यांसाठीच्या काही जागा ताब्यात नसतानाही निविदा काढण्याची घाई करण्यात आली, अशी त्यावर बरीच चर्चा झाली. उपसभापतींनी त्याची दखल घेत यात लक्ष घालण्याचे आदेश मंत्र्यांना दिले. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी चौकशी करू, तोपर्यंत काम स्थगित राहील, असे आश्वासन सभागृहात दिले होते. मात्र, आता अधिवेशन संपून महिना झाला, तरीही पालिका प्रशासनाला चौकशीचे आदेश अद्याप मिळालेलेच नाहीत. निविदा प्रक्रियेची कागदपत्रेही मागवून घेण्यात आलेली नाही किंवा या प्रकरणात काय झाले त्याची सविस्तर माहिती द्यावी, असेही नेहमीप्रमाणे नगरविकास विभागाने विचारलेले नाही. त्यामुळेच मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही टाक्यांचे काम सुरूच आहे. ठेकेदाराने टाक्यांच्या जागांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. ते बहुतांशी पूर्ण झाले असून, काही दिवसांत प्रत्यक्ष कामालाही सुरूवात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) दाखल होऊ शकतो हक्कभंग ४पाटील यांनी विधान परिषदेत या विषयावरील चर्चेनंतर व उपसभापतींनी आदेश दिल्यावर, चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. ते पाळण्याचे त्यांच्यावर कायदेशीर बंधन आहे. तसे झाले नाही तर प्रश्नकर्ते त्यांच्यावर हक्कभंग दाखल करू शकतात.आचारसंहितेमुळे अधिकार आयुक्तांकडेपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाची मदत घेत योजनेला सुरूवातीला मंजुरी दिली होती. त्यासाठी पाणीपट्टीत पहिल्या वर्षी १० टक्के व नंतर पुढची सलग ५ वर्षे प्रत्येकी ५ टक्के, अशी वाढही मंजूर केली.  काँग्रेस, मनसे यांनी विरोध केला होता. मात्र, टाक्यांचे बांधकाम; तसेच मीटर बसविण्याचा विषय व योजनेच्या खर्चासाठी कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव येताच राष्ट्रवादी काँग्रेसनेही योजनेला विरोध केला आहे.  पालिका आयुक्त कुणाल कुमार मात्र योजना कोणत्याही स्थितीत राबविण्याबाबत आग्रही आहेत. महापालिका निवडणूक आचारसंहितेमुळे आता सर्वाधिकार आयुक्तांकडे आल्यामुळेच विधान परिषदेतील मंत्र्यांच्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पालिका वर्तुळात बोलले जात आहे.