शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेड धरणातच खोदताहेत खाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 01:32 IST

ठेकेदारीच्या माध्यमातून मिळविलेल्या कामासाठी लागणारे मटेरियल चक्क धरणाच्या जलाशयात खाण पाडून काढले जात आहे.

आंबेठाण : ठेकेदारीच्या माध्यमातून मिळविलेल्या कामासाठी लागणारे मटेरियल चक्क धरणाच्या जलाशयात खाण पाडून काढले जात आहे. तेदेखील कुठलीही शासकीय किंमत न भरता आणि विनापरवानगी वापरून लाखो रुपयांचा घोटाळा करण्याचा प्रकार सध्या खेड तालुक्यात सुरू आहे. एकप्रकारे दिवसाढवळ्या ही लूटच सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अधिक नफा शिल्लक राहावा म्हणून बेलगाम होत चाललेल्या अशा ठेकेदारांना योग्य वेळेत चाप बसण्याची गरज निर्माण झाली आहे.शिवे (ता. खेड) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नागोबाची वस्ती या ठिकाणाकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी खडीकरण आणि मुरुमीकरणाचे काम केले जात आहे. हे सुरू असणारे काम २५-१५ (ग्रामविकास निधी) मधून केले जात आहे. त्यासाठी ५ लाखांचा निधी आहे. परंतु या ठिकाणी वापरली जाणारी खडी ही भामा-आसखेड धरणाच्या जलाशयात खोदाई करून काढली जात आहे. त्यासाठी धरणाच्या जलाशयात चक्क खाण पाडली असून, त्यामधून ट्रॅक्टर आणि मजूर लावून खोदाई करून खडी पाडली जात आहे. धरणाच्या जलाशयात एखाद्या डोंगराचा कडा असावा, अशाप्रकारे या ठिकाणी खोदाई सुरू आहे. याशिवाय या रस्त्याच्या कामासाठी वापरला जाणारा मुरुमदेखील आजूबाजूच्या जागेतूनच काढला जात असून, तोदेखील अगदी मातीमिश्रीत वापरला जात आहे. त्यामुळे या कामासाठी वापरला जाणारा सर्व मालच झोलझाल करून मिळविला जात असल्याचा प्रकार या ठिकाणी घडत आहे. सर्व माल निकृष्ट आणि फुकटचा वापरायचा आणि त्या माध्यमातून लाखो रुपयांचा माल कमवायचा, असा प्रकार या ठिकाणी घडत आहे. या ठिकाणी धरणाच्या जलाशयात खाण पाडून खडी उपसा केला जात असतानादेखील प्रशासन गप्प का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यामागे काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध आहेत का? यात कोणा पुढाऱ्याचे हात गुंतले आहेत का? याचा सखोल विचार होणे अतिशय गरजेचे आहे. आज धरणाच्या जलाशयात खाण पाडली जात आहे. उद्या अशा लोकांचे असेच फावत गेले, तर यापुढची पायरी ते गाठतील आणि मग निश्चितच गोंधळ वाढेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा बेलगाम ठेकेदारांना योग्य वेळेत वठणीवर आणून त्यांना कायदा आणि नियम काय असतात, याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.