शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमची महापालिकेत ‘एन्ट्री’

By admin | Updated: September 15, 2015 04:45 IST

आधी नांदेड नंतर औरंगाबाद आणि आता पुणे महापालिकेत राजकीय प्रवेशासाठी आॅल इंडिया मजलिसे इत्तेहाद्दुल मुसलमीनने (एमआयएम) तयारी सुरू केली आहे.

पुणे : आधी नांदेड नंतर औरंगाबाद आणि आता पुणे महापालिकेत राजकीय प्रवेशासाठी आॅल इंडिया मजलिसे इत्तेहाद्दुल मुसलमीनने (एमआयएम) तयारी सुरू केली आहे. शहरात मुस्लिमांची सर्वाधिक संख्या असलेल्या कोंढव्यामधील प्रभाग क्रमांक ६३ (अ) मधून पक्षाकडून पोटनिवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, या प्रभागाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून, त्याचा अहवाल पुढील आठवड्यात पक्षश्रेष्ठींसमोर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रभागातील शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक भरत चौधरी यांचे जात व जात वैधता प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने रद्द केल्याने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. त्यानुसार, या प्रभागासाठी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. विधानसभा निवडणुकीतही पक्षाने २४ उमेदवार उभे केले होते. २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी सुरू करण्यात आलेली आहे. मागील महिन्यात चौधरी यांचे जात आणि वैधता प्रमाणपत्र रद्द झाले, त्यामुळे नगरसेवकपद रद्द झाले आहे.महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम - एमआयएमकडून या पोटनिवडणुकीकडे आगामी महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. कोंढवा परिसरात प्रामुख्याने चौधरी यांच्या प्रभागात जवळपास ७० टक्क्यांहून अधिक मुस्लीम मतदारांची संख्या आहे. ही बाब एमआयएमच्या पथ्थ्यावर पडणारी आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पक्षाने महापालिकेत प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकांमध्ये असलेले मतदार, उमेदवारांना पडलेली मते, मुस्लिम मतदारांच्या मतदानाचा कौल संकलित करण्यात येत आहे. प्रत्यक्ष भेटी घेऊन मतेही जाणून घेतली जात आहेत. आता मतदारांचा कौल कोणाला? -हडपसर विधानसभा मतदारसंघात हा भाग येतो. यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या ठिकाणच्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात मतदान टाकले आहे. मात्र, तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून आलेला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला नाकारत या मतदारांनी भाजपला साथ दिली आहे. या निवडणुकांवेळी एमआयएमचे अस्तित्व असले तरी पक्षाकडून निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नव्हता. पुढील आठवड्यात होणार निर्णय - या सर्वेक्षणाचा अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे पुणे शहराची माहिती असलेले आमदार इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ही निवडणूक लढविण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. ही स्थिती पक्षासाठी चांगली असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरण्यात आला असून, पक्षश्रेष्ठी हीच भूमिका कायम ठेवण्यात येणार असून, निवडणूक लढविण्याची मागणी करणार असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पोटनिवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. प्रभागात सर्वेक्षण घेण्यात येत असून, त्याचा अहवाल पुढील दोन दिवसांत पक्षश्रेष्ठींना सादर केला जाईल. त्यानुसार, पुढील निर्णय घेण्यात येईल.- अंजुमन इनामदार (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, एमआयएम)