मंचर : कांदा बियाण्यात शेतकऱ्यांची लोखो रुपयांची फसवणूक झाली आहे. चार हजार किलो या भावाने घेतलेले कांदा बी शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले असून, अनेक शेतात कांद्याऐव(वार्ताहर)णुकीची तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मागील दोन वर्षांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. पारंपरिक पद्धतीचे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. अनेक शेतकरी कांदा बी घरच्या घरी तयार करतात; मात्र हे प्रमाण कमी आहे. त्याऐवजी बी विकत घेऊन त्याची रोपे प्राधान्याने तयार केली जातात. या रोपांची लागवड शेतात करून कांदा उत्पादन घेतले जाते.कांदा बीच्या दरात वाढच होत गेली आहे. दोन वर्षांपूर्वी ५०० रुपये किलो या भावाने बी उपलब्ध होते. मागील वर्षापासूनतुटवडा भासू लागला. मात्र त्यानंतर कांदा बियाण्याच्या दरात भरमसाट वाढ झाली. सुरुवातीस पंचवीचशे रुपये तर शेवटच्या टप्प्यात तब्बल चार हजार रुपये किलो कांदा दर झाला. शेतकऱ्यांना कांदा बी मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. जळगाव, जालना, औरंगाबाद, नाशिक येथे जाऊन शेतकऱ्यांनी कांदा बी आणले. स्थानिक व चाकण बाजारातही कांदा बी मिळाले.शेतकऱ्यांनी रोपे तयार करून लागवड केली. पिकांची काळजी घेतली. महागडी खताची मात्र दिली. कांदापीक दोन महिन्यांचे झाले तेव्हा फसवणूक झाल्याचे दिसून आले. दुभाळके (ढेंगळे) मोठ्या प्रमाणावर दिसून आले व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुभाळके कांदा वजनाला हलका तसे बदला म्हणून त्याची गणना होते. तो शेतात जास्त दिवस ठेवल्यास वजनाला हलका होऊन खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची अशी फसवणूक झाली आहे. जिल्हा व इतर भागातील बियाण्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार पाहिले तर लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे. (वार्ताहर)४शेतकरी कांदा बी खरेदी करताना खरेदी पावती बनवत नाहीत. त्यामुळे फसवणूक झाली तर तक्रार करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. काहींनी धाडस करून तक्रार केली; मात्र हे बी मी दिलेच नाही असा पवित्रा बी विक्रीकरणारांनी घेतला. काहींनी तर दलालीचा अवलंब केला. दूरवरून मोठ्या प्रमाणावर बी आणून त्यांनी ते शेतकऱ्यांना विकले. मध्ये मोठा नफा कमविला. आता त्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.४खरीप हंगामाची बियाणे रब्बीला वापरा, हा प्रकार झाला. जुने बियाणाची उगवणच झाली नाही. यात फसवणुकीचा आकडा मोठा असेल. अवेळी पाऊस, थंड वातावरण, नत्रयुक्त खताचा जास्त वापर, जास्त दिवसांचे रोप ही कांदापिकाला फटका बसण्याची काही कारणे असून, त्यामुळेही डेंगळे आले आहेत.चार एकर कांदा लागवड केली. त्यात तीस टक्के डेंगळे निघाली आहेत. त्याचा फटका उत्पादक व उत्पन्नास बसणार आहे. शेतकऱ्यांनी यापुढे बी घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे. जिल्ह्याच्या बाहेरून आलेले बियाणे प्रामुख्याने फसवे असून, त्या बियाण्यालाच डेंगळे आली आहेत.- गोविंद जाधवकांदा उत्पादक शेतकरी, ओझर
कांदा बियाण्यात लाखोंची फसवणूक
By admin | Updated: March 23, 2015 23:07 IST