शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लग्न झालेल्या महिलेचे पुन्हा लग्न लावून लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:11 IST

वडगाव मावळ : लग्न झालेल्या महिलेचे पुन्हा लग्न लावून नवरदेवाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ११ जणांच्या ...

वडगाव मावळ : लग्न झालेल्या महिलेचे पुन्हा लग्न लावून नवरदेवाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ११ जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये नऊ महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

याबाबत गणेश अर्जुन सावळे (वय ३२, व्यवसाय मुंबईचे डबेवाले, रा. सध्या दिवड, ता. मावळ, जि. पुणे, मूळ रा. मुलूंड काॅलनी, हनुमान पाडा) याने फिर्याद दिली. याप्रकरणी मोना नितीन साळुंके (वय २८, रा. मांजरी, पुणे), दिगंबर जगन्नाथ भांबरे (वय २९, रा. मांजरी बुद्रुक), सोनाली ऊर्फ विद्या सतीश खंडाळे (वय २७ , रा. पद्मावती, कात्रज, धनकवडी), ज्योती रवींद्र पाटील, वय ३५, रा. केसनंद फाटा, वाघोली), सतीश रंगनाथ झांबरे (वय २९ रा, धायरी), महानंदा तानाजी कासले (वय ३९ रा. हडपसर), रूपाली सुभाष बनपटटे (वय ३७), कलावती सुभाष बनपट्टे (वय २५), सारिका संजय गिरी (वय ३३, सर्व रा. वडारगल्ली, पुणे), स्वाती धर्मा साबळे (वय २४, रा. भेकराईनगर, हडपसर), पायल गणेश साबळे (वय २८, रा. गडद, ता. खेड), माणिक लोटे व त्याचा एक सहकारी नाव-पत्ता माहीत नाही, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : साबळे हा मुंबईत डबे पोहोचवण्याचे काम करतो. लग्न जमवून देणारा एक जण आहे असे त्याच्या मित्राने सांगितले. त्यानंतर त्याने माणिक लवटे याच्याबरोबर संपर्क केला. खेड तालुक्यातील गडद गावी बोलवले. मुलगी दाखवली. दोन दिवसांनंतर घर पाहण्यासाठी दिवड गावी आला. मुलगी पसंत पडल्यावर मध्यस्थांनी अडीच लाखांची मागणी केली. नवरदेवाने देण्याचे कबूल केले. लग्नाची तारीख २१ जानेवारी ठरली. सोनाली ऊर्फ विद्या सतीश खंडागळे (वय २७, रा. कात्रज, पुणे) हिचे आळंदी येथे लग्न झाले. आठ दिवसाने कळाले तिला दोन मुली आहेत. शंका आल्याने नवऱ्याने मोबाईल चेक केला. त्यामध्ये तिचे संभाषण ऐकले की माझे ठरलेले पैसे द्या, मी पैसे व सोने घेऊन पळून येते. यानंतर ताजे गावचे माजी उपसरंपच नीलेश केदारी, सदस्य उमेश केदारी, महादू मालेकर, अनंता मालेकर, रोहिदास आमले यांनी मुलीला न कळता गुन्हे अन्वेषण पोलिसांना माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दतात्रय जगताप, उपनिरीक्षक शीला खोत, सुनीता मोरे, नंदा कदम यांनी सापळा रचून या अकरा जणांना अटक केली. पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शीला खोत करीत आहेत.