शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांसाठी एमएच १२, एमएच सिरीजला भाव

By admin | Updated: September 21, 2015 03:48 IST

दुचाकी, मोटार विकत घेताना आपल्या गाडीला आरटीओकडून मनपसंत नंबर मिळावा, यासाठी अगोदरपासूनच फिल्डिंग लावली जाते

पुणे : दुचाकी, मोटार विकत घेताना आपल्या गाडीला आरटीओकडून मनपसंत नंबर मिळावा, यासाठी अगोदरपासूनच फिल्डिंग लावली जाते... चॉइस नंबरसाठी पाहिजे तेवढी रक्कम मोजण्याची तयारी वाहनचालकांकडून ठेवली जाते... त्यातच सध्या पुणे आरटीओकडून ‘एमएच १२, एमएच’ ही सिरीज सुरू झाली आहे, त्यामुळे वाहनांच्या क्रमांकात दोन वेळा एमएच येणार असल्याने हा आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी लोकांच्या उड्या पडत आहेत... सर्वाधिक नंबर विकले जाण्याचा विक्रम होण्याची शक्यता असून आरटीओ मात्र मालामाल होत आहे.चॉइस नंबर घेण्यासाठी वाहनचालकांमधील क्रेझ लक्षात घेऊन ते क्रमांक लिलाव पद्धतीने सर्वाधिक बोली लावणाऱ्याला देण्यास आरटीओने सुरुवात केली आहे. प्रत्येक क्रमांकाची विशिष्ट रक्कम आरटीओने निश्चित केली आहे. तसेच एकच क्रमांक अनेकांनी मागणी केल्यास लिलाव पद्धतीने त्या क्रमांकाचे वाटप केले जाते. या योजनेमुळे आरटीओला कोट्यवधी रूपयांचा महसूल दरवर्षी मिळत आहे.शहरात दररोज हजारो नवीन वाहनांची विक्री होते. त्या वाहनांना आरटीओकडे सुरू असलेल्या सिरीजनुसार क्रमांक दिले जातात. आरटीओच्या एका सिरीजमध्ये ९ हजार ९९९ क्रमांक असतात. राज्यातील सर्व वाहनांच्या क्रमांकाची सुरुवात महाराष्ट्राचा सांकेतिक कोड असलेल्या एमएचने होते. त्यानंतर आरटीओचा सिरीज कोड येतो. सध्या दुचाकीकरिता पुणे आरटीओची एमएच ही सिरीज सुरू आहे. त्यामुळे क्रमांकामध्ये दोन वेळा एमएच हा शब्द येणार आहे. हा क्रमांक घेण्यासाठी वाहनचालकांची धडपड सुरू आहे. ही सिरीज दुचाकींची असली तरी नियमानुसार तिप्पट रक्कम भरून चारचाकी वाहनांकरिताही या सिरीजमधील क्रमांक घेतले जात आहेत. आरटीओने दुचाकीसाठी १, ९,९९,९९९, ७८६ असे व्हीआयपी क्रमांक हवे असल्यास ५० हजार रुपये शुल्क आहे. दुचाकीच्या सिरीजमधील हाच क्रमांक चारचाकी वाहनास हवा असल्यास तिप्पट म्हणजे दीड लाख रुपये शुल्क आरटीओला भरावे लागते. त्यानंतर पुन्हा एकापेक्षा जास्त मागणी आल्यास लिलाव पद्धतीने त्याचे वाटप होते.(प्रतिनिधी)