शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रतिनिधी पडणार पुरुषांना भारी

By admin | Updated: December 16, 2014 04:18 IST

महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डासह खुल्या वॉर्डातही महिला उमेदवार असल्याने त्याची संख्या वाढली आहे. खडकीसह पुणे आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातही हे चित्र आहे.

मिलिंद कांबळे, पिंपरीमहिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डासह खुल्या वॉर्डातही महिला उमेदवार असल्याने त्याची संख्या वाढली आहे. खडकीसह पुणे आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातही हे चित्र आहे. यामुळे महिलांना लोकप्रतिनिधी पदासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. हा बदल महिला सक्षमीकरणास प्रोत्साहन देणारा ठरत आहे. देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डात महिलांना ३३ टक्के आरक्षण मे २००८ च्या निवडणूकीपासून लागू झाले आहे. यानुसार खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात आठपैकी तीन आणि देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये सातपैकी दोन वॉर्ड महिलासाठी राखीव झाले आहेत. उर्वरित वॉर्ड खुला आणि मागासवर्गीय गटासाठी आहेत. गेल्या वेळेस पुरुष मंडळींनी पतीला संधी देत निवडणूकीत उतरविले. नगरसेवक म्हणून महिलांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी वॉर्डात सक्रियता दाखविली. वर्ष-दोन वर्षांत त्या चांगल्याच रुळल्या. लाजरेपणा सोडत लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय झाल्या. बोर्ड कामकाज आणि सामाजिक क्षेत्रात त्या पतीच्या गैरहजेरीतही उत्तम प्रकारे कारभार सांभाळू लागल्या. या त्याच्या कार्यपद्धतीमुळे नवरे मंडळीपेक्षा या महिलाच अधिक लोकप्रिय झाल्या. नागरिकांकडून त्यांना अधिक पसंती दिली जात आहे. निवडणूकीपूर्वी या बाबतची चाचपणी घेतली गेली. त्यात ही बाब उघड झाल्याने नवरे मंडळीनी आपल्या उत्साहाला आवर घालत, नाईलाजस्तव पुन्हा पत्नीला संधी दिली आहे. यामुळे खुला वॉर्डातही महिला उमेदवार रिंगणात आहेत. इच्छुक पुरुष मंडळींनी राखीव वॉर्डात आपल्या घरातील महिलांना पुढे केले आहे. पती, सून, मुलगी,आई, वहिणी आदीना संधी दिली आहे. या कारणामुळे महिला राखीव वॉर्ड आणि खुल्या वॉर्डातील उमेदवारांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मतदारांनी पुरुषांपेक्षा महिलांना पसंती दिल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डात महिला लोकप्रतिनिधीची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असणार आहे. यामुळे बोर्डाची सुत्रे महिला वर्गाकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खडकी बोर्डातील महिला राखीव असलेल्या तीन वॉर्डात एकूण २८ महिला तर, खुल्या वॉर्डात ५ महिला आहेत. देहुरोडमध्ये महिलांच्या दोन राखीव वॉर्डात ८ जणी तर, खुल्या वॉर्डात ४ जणी रिंगणात आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातही महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे.