शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाला राजकीय व्यक्तींचीच मांदिआळी

By admin | Updated: November 16, 2015 01:57 IST

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्यिकांऐवजी राजकीय व्यक्तींचीच गर्दी दिसण्याची शक्यता आहे

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्यिकांऐवजी राजकीय व्यक्तींचीच गर्दी दिसण्याची शक्यता आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी ते स्वीकारले असल्याचे सूत्रांनी सांगितले.साहित्य संमेलनाच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी येत्या २६ तारखेला साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे, ते त्यांनी स्वीकारले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनाही निमंत्रण देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. ज्ञानपीठप्राप्त साहित्यिकांना संमेलनासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. ज्या साहित्यिकांनी निमंत्रणाचा स्वीकार केला आहे त्यांच्यावर माहितीपट बनविण्यास सुरुवात झाली आहे. संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रमांविषयी माहिती दिली जाईल त्या वेळी या साहित्यिकांविषयीही माहिती दिली जाईल, असे डॉ. पाटील म्हणाले. संमेलनाला अधिकाधिक साहित्यिकांची हजेरी असावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. साहित्यिकांना निमंत्रणपत्रिकेबरोबरच पुस्तकेही देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.