शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची घरपोच वैद्यकीय सेवा

By admin | Updated: May 23, 2016 02:00 IST

ज्येष्ठ व सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ‘आपला फॅमिली डॉक्टर’अंतर्गत २४ तास घरपोच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या उपक्रमाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते

पुणे : ज्येष्ठ व सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ‘आपला फॅमिली डॉक्टर’अंतर्गत २४ तास घरपोच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या उपक्रमाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते लोकार्पण रविवारी (दि. २२) भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन, कै. वसंतराव बागुल उद्यान सहकारनगर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिका आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी होते. या प्रसंगी डॉ. अनुराधा पुरोहित, डॉ. नितीन भगली, डॉ. एन. पी. राव, डॉ. गुजराथी, डॉ. यश बहुलीकर, डॉ. नितीन बोरा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयोजन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले.आपले आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांना असंख्य वैद्यकीय प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यांना अल्पशी मदत म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे बागुल म्हणाले. ज्येष्ठ व सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आपला फॅमिली डॉक्टर अंतर्गत २४ तास घरपोच वैद्यकीय सेवा, घरपोच औषधे सेवा, डायग्नोस्टिक सेवा या उपक्रमांतर्गत सवलतीच्या दरात पुरवली जाणार आहे. तसेच विविध आजार, पॅरालिसिस, कॅन्सर, फ्रॅक्चर, शस्त्रक़्रियेनंतरची देखभाल, पार्किसन्स, डायबेटिस, बेडसोर्स आदी विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील. या उपक्रमातील औषध सेवेसाठी सहकारनगर नं. २ मधील सचिन मेडिकल, शिवदर्शन चौकातील नम्रता मेडिकल, अरण्येश्वरमधील न्यू शिवशाही मेडिकल, पद्मावतीतील न्यू ओम मेडिकल हे अल्पदरात सेवा देणार असून हा उपक्रम डॉक्टर कल्पेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविला जाणार आहे. घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन तर अमित बागुल यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)