शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राहणार पुण्यात ‘मेडिकल सर्टिफिकेट’ चेन्नईचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

ई-पाससााठी बनवेगिरी : खोट्या कारणांमुळे निम्मे अर्ज नामंजूर लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वैद्यकीय कारणासाठी ई-पाससाठी अर्ज केला तर ...

ई-पाससााठी बनवेगिरी : खोट्या कारणांमुळे निम्मे अर्ज नामंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वैद्यकीय कारणासाठी ई-पाससाठी अर्ज केला तर मंजूर होईल असे समजून अनेकांनी अर्ज केले. मात्र, बनावटगिरीमुळे यातले सुमारे ५४ टक्के अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांकडे ई-पाससाठी गेल्या दोन महिन्यांत तब्बल ३ लाख ३३ हजार ९४७ अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ७९ हजार २६९ अर्ज नामंजूर करण्यात आले.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २३ एप्रिल २०२१ पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसेच इतर राज्यात जाण्यासाठी डिजिटल पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी पुणे पोलिसांनी डिजिटल पास कक्षामध्ये १ पोलीस निरीक्षक, ४ सहायक पोलीस निरीक्षक, २ उपनिरीक्षक व ४० पोलीस अंमलदार यांचे पथक २४ तासांत कार्यन्वित करण्यात आले होते.

राज्य शासनाने अनलॉकमध्ये ५ लेव्हलमध्ये जिल्ह्यांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यात १ ते ४ लेव्हलमधील जिल्ह्यात जाण्यासाठी कोणत्याही ई-पासची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. फक्त लेव्हल ५ मधील जिल्ह्यात जाण्याकरिता अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणास्तव ई-पास पुरविण्यात येतील. सध्या राज्यातील कोणताच जिल्हा लेव्हल ५ मध्ये नाही. त्यामुळे आता राज्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता लागणार नाही.

चौकट

सर्वांचीच ‘मेडिकल इमर्जन्सी’ कशी?

जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू आणि वैद्यकीय कारणासाठी अर्ज मंजूर केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारणे देणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. सुरुवातीला असे अर्ज मंजूरही झाले. परंतु, हीच कारणे देणाऱ्या अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अर्जांची बारकाई तपासणी सुरू करण्यात आली. त्यात बनावटगिरी आढळून आल्याने असे अर्ज नामंजूर करण्यात आले.

चौकट

या कारणांमुळे झाले अर्ज नामंजूर

ई-पास देताना प्रामुख्याने कोविड चाचणीचे सर्टिफिकेट जोडणे आवश्यक होते. त्याबरोबर जिल्ह्यांतर्गत प्रवासासठी ई-पासची गरज नव्हती. मात्र, अनेकांनी शहरातल्या-शहरात, जिल्ह्यात जाण्यासाठीही अर्ज केले होते. अनेक सरकारी तसेच अत्यावश्यक सेवेतील लोकांना ई-पासची गरज नव्हती अशा बहुसंख्यांनी अर्ज केलेले आढळले. त्यामुळे त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. याशिवाय अनेकांनी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आढळून आली नाही. त्यांचेही अर्ज फेटाळले.

चौकट

ई-पाससाठी आलेले अर्ज - ३ लाख ३३ हजार ९४७

मंजूर झालेले अर्ज - ७९ हजार ८३२

नामंजूर झालेले अर्ज - १ लाख ७९ हजार २६९

चौकट

निवास पुण्यात, कागदपत्रे दुनियाभरची

ई-पाससाठी अर्ज करताना अनेकांना आपण जोडलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे पोलीस कशी तपासणार, असे वाटले. म्हणून अनेकांनी वेगवेगळ्या शहरातील वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली. पोलिसांनी त्यांची बारकाईने तपासणी करुन धूळफेक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. एकाने तर पुण्यात राहत असताना चक्क चेन्नईचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडलेले आढळून आले. सहाजिकच त्याचा अर्ज फेटाळण्यात आला.

चौकट

केवळ जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू आणि वैद्यकीय कारणासाठी प्रामुख्याने ई-पास मंजूर करण्यात आले. अनेकांनी कारण नसताना तसेच योग्य कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांचे अर्ज नामंजूर केले गेले आहेत.

शिल्पा चव्हाण, पोलीस निरीक्षक, सेवा विभाग