शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

महापौरनिवड बिनविरोध?

By admin | Updated: March 8, 2017 05:04 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडीतून राष्ट्रवादी माघार घेणार असल्याने भाजपाचा महापौर, उपमहापौरही

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडीतून राष्ट्रवादी माघार घेणार असल्याने भाजपाचा महापौर, उपमहापौरही बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत तब्बल ७७ जागा भाजपाने पटकाविल्या, तर राष्ट्रवादी काँगे्रसला ३६ जागांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे संकेत पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील नगरसेवकांच्या बैठकीत दिले आहेत. त्यास या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. या दोन्ही पदांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी न उतरल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.दरम्यान, महापौर, उपमहापौर पदासाठी भाजपाकडून अनेकजण इच्छुक आहेत. मंगळवारी महापौर पदासाठी नगरसचिव कार्यालयातून चार अर्ज नेण्यात आले, तर उपमहापौर पदासाठी एकूण सहा अर्ज नेले. भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने महापौर, उपमहापौर यांच्या निवडी बिनबिरोध होणार असल्याचे बोलले जात असले, तरी इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.तसेच या पदांवर आपल्या समर्थकालाच संधी मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. (प्रतिनिधी)भाजपाचा पहिला महापौर, उपमहापौर कोण?महापौर आणि उपमहापौरपदाची निवड १४ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. ९ मार्च रोजी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर १४ मार्चला होणाऱ्या निवडणुकीवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई हे पीठासन अधिकारी असतील. भाजपाकडून ९ मार्च रोजी महापौरपदासाठी एकच उमेदवारी अर्ज भरला गेल्यास भाजपाचा पहिला महापौर कोण, हे त्याच दिवशी स्पष्ट होईल.दरम्यान, भाजपाकडून महापौरपदासाठी नामदेव ढाके, संतोष लोंढे, शत्रुघ्न काटे, केशव घोळवे, वसंत बोराटे यांची नावे आघाडीवर आहेत.