शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कारखाना निवडणुकीत ‘१०’च्या नोटांची कमाल

By admin | Updated: April 18, 2015 23:32 IST

निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यातूनही मार्ग न काढणारे राजकारणी ते कसले.

बारामती : निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यातूनही मार्ग न काढणारे राजकारणी ते कसले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘१० रुपयां’च्या नोटांनी कमाल केली, अशीच चर्चा होत आहे़ आर्थिक प्रलोभन दाखवून हक्काच्या मतदानाचा नवा फंडाही यानिमित्ताने पुढे आला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे कवित्व आता या चर्चांमधून पुढे येत आहे. कोणतीही निवडणूक दोन्ही बाजूच्या नेत्यांना प्रतिष्ठेची असते. त्यामुळे सर्व कायद्यांवर मार्ग काढून प्रचार केला जातो. निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बंदी आहे. मात्र, मर्यादित मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आर्थिक प्रलोभन दाखविले जाते. त्यातूनही अनेकदा अपयशच पदरी येते. अनेकदा तर विरोधकांकडून ‘पैसे त्यांचे घ्या, मतदान आम्हाला करा’ असेही सांगितले गेल्याची उदाहरणे असून त्यावर निवडणूक आयोगाने कारवाईही केली आहे. परंतु, आपल्याला शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी मतदारांना बांधून घेण्यासाठी नवी शक्कल लढविण्यात आली. मताला ठरलेल्या दरापैकी काही रक्कम रोख दिली. त्याबरोबरच एक दहा रुपयांची नोट देण्यात आली. या नोटेवरील शेवटचे तीन आकडे आणि संबंधित मतदाराचे नाव लिहून घेतले गेले. त्याला असेही सांगण्यात आले, की मतदान झाल्यावर निवडून आलो, तर ही १० रुपयांची नोट दाखविल्यावर उर्वरित रक्कम मिळेल. काल सायंकाळपासूनच निवडक मतदारांनी आपली १० रुपयांची नोट ‘कॅश’ करून घेतली. ऊसदरासाठी आंदोलन, किमान निर्धारित मूल्यासाठी (एफआरपी) आंदोलन केले जाते, त्या वेळी कारखान्याची आर्थिक स्थिती बेताची आहे; कारखानदारी अडचणीत येईल, असे सांगितले जाते. त्यामुळे शेतकरी सभासददेखील शांत बसतात. मात्र, निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर येतो. त्यामुळे सभासदांचीदेखील ‘चांदी’ होते, हेदेखील यानिमित्ताने दिसून आले. ४राजकीय नेतेमंडळी आपल्या सोयीसाठी दबावाचे राजकारण करतात. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांशी चर्चा करतात. तसेच किस्से सोमेश्वरच्या निवडणुकीत घडले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सोमेश्वरची निवडणूक होती. वजनदार नेत्यावर दबाव टाकण्यासाठी एका नेत्याने अगोदर विरोधकांशी संधान साधले. अटी, शर्ती घातल्या. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यात यश आले. जिल्हा बॅँकेला ‘बिनविरोध’चा शब्द घेतला. त्यानंतर विरोधकांशी चर्चा करण्याचेच थांबविले. मात्र, तोपर्यंत विरोधकांनी आखलेले डावपेच सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘दबाव’ तंत्रातील नेत्यांना यश आले.