शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मावळात संततधार; ओसंडले धबधबे

By admin | Updated: June 26, 2017 03:55 IST

परिसरात शनिवारी दिवस-रात्र झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्ते व काही सोसायट्या पाण्याखाली गेल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी/लोणावळा : परिसरात शनिवारी दिवस-रात्र झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्ते व काही सोसायट्या पाण्याखाली गेल्या होत्या. लोणावळा येथे शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवार सकाळी साडेआठ दरम्यान २४ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दुपारनंतर मात्र पावसाने उसंत घेतली. २४ तास झालेल्या जोरदार पावसाने शहरातील बाजारपेठ, नांगरगाव, भांगरवाडी, तुंगार्ली, ट्रायोज मॉल रस्ता, मावळा पुतळा चौक, गवळीवाडा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. भांगरवाडी व नांगरगाव भागात नदी व नालेसफाई न झाल्याने पहिल्याच जोरदार पावसात अनेक सोसायट्या व घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. स्थानिक नगरसेवकांनी जेसीबी मशिनच्या साहाय्याने पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर केल्यानंतर व रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने हे पाणी खाली झाले. ओळकाईवाडी व भैरवनाथनगर परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. लोणावळा-पवनानगर हा राज्य महामार्ग पाणी भरल्याने वाहतुकीसाठी बंद झाला होता. गणपती मंदिर परिसरात ओढे नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसात नागरिकांना पुराचा सामना करावा लागला. कुणेगावमार्गे राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर डेल्ला हॉटेलसमोर सुमारे दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर साचले होते. जागोजागी झालेली बांधकामे व भराव यामुळे पाण्याचे प्रवाह बंद झाल्याने सर्वत्र पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले.