शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यात ७૪ टक्के मतदान

By admin | Updated: February 21, 2017 21:51 IST

मावळ तालुका पंचायत समितीच्या दहा व पुणे जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी आज ७૪ टक्के मतदान झाले. मावळ तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या सावळा, माळेगाव बु., खांड, इंगळून

लोणावळा : मावळ तालुका पंचायत समितीच्या दहा व पुणे जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी आज ७૪ टक्के मतदान झाले. मावळ तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या सावळा, माळेगाव बु., खांड, इंगळून, साते या पाच गावांमधील मतदान केंद्रावर उशिरा पर्यत मतदान सुरु होते.    मावळ तालुक्यात १ लाख ७६ हजार ३७८ मतदारांपैकी १ लाख ३० हजार ५२२ मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. यामध्ये ७० हजार ८३९ पुरुष व ५९ हजार ६८३ महिला मतदारांचा समावेश आहे.    आज सकाळी ७:३० वाजता मावळातील २१६ मतदान केंद्रावर शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिल्या दोन तासात ९:३० वाजेपर्यत मतदानांचा वेग संथ राहिल्याने ९.६५ टक्के मतदान झाले. तदनंतरच्या प्रत्येक दोन तासांच्या टप्प्यात सरासरी १५ टक्के मतदान झाल्याने दुपारी ३:३० पर्यत मावळात ५५.७८ टक्के मतदान झाले होते. किरकोळ वाद वगळत मावळात सर्वत्र शांततेमध्ये मतदान झाले. शिलाटणे गावात मतदान मशिनमध्ये बिघाड झाल्याने ૪५ मिनिटे मतदान बंद होते, तेवढा वेळ नंतर वाढवून देण्यात आला.      ग्रामीण भागात व ज्या गावातून उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा पहायला मिळत होत्या. संवेदनशिल केंद्रावर पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मावळात १६ पोलीस अधिकारी २९३ पोलीस कर्मचारी, ५૪ होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. पोलीस ठाण्याचे अधिकारी हे मतदान केंद्रावर जातीने लक्ष ठेऊन असल्याने कसलाही गैरप्रकार झाला नाही.ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी भाग व दुर्गम भागात मतदानाचा वेग काहीसा कमी होता. वडगाव मात्र याला अपवाद ठरले. कार्ला व शिलाटणे या दोन गावांमध्ये आदर्श मतदान केंद्र बनविण्यात आले असून मतदान केंद्रावर मतदारांसाठी मंडप, पिण्याचे पाणी याची सोय करण्यात आली आहे तसेच आकर्षक रांगोळी काढत मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे. मतदान करणार्‍यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात असल्याने मतदारांनी देखिल आनंद व्यक्त केला. मावळच्या निवडणुक निरिक्षकांनी या केंद्रांना भेटी देत सोयीसुविधांची पाहणी केली.