शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपद निवडीत खडकवासल्याचे गणित

By admin | Updated: September 11, 2014 04:38 IST

पुणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीसाठी खडकवासला मतदारसंघाचे गणितच महत्त्वाचे ठरले.

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीसाठी खडकवासला मतदारसंघाचे गणितच महत्त्वाचे ठरले. खडकवासल्याचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे धनकवडी परिसरातील असल्याने त्यांना रोखण्यासाठीच दत्तात्रय धनकवडे यांना महापौरपद देण्यात आले आहे. नगरसेवक दत्तात्रय धनकवडे राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. हवेली पंचायत समिती उपसभापती व बाजार समिती संचालक म्हणून त्यांनी कामे केलेली आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत धनकवडे यांना महापालिकेत कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नव्हते. खडकवासला मतदारसंघात ते दावेदार मानले जात होते. धनकवडे यांना महापौरपद देण्यासाठी नगरसेवक अप्पा रेणुसे, विशाल तांबे, शिवलाल भोसले, मोहिनी देवकर, सुवर्णा पायगुडे, भारती कदम, पिंटू धाडवे, संतोष फरांदे व युवक शहराध्यक्ष अजित बाबर यांनी एकत्रित शिफारस अजित पवार यांच्याकडे केली होती. काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपमहापौरपदासाठी आतापर्यंत संधी न मिळालेल्या उमेदवाराला संधी देण्याचा ठराव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविला होता. तरीही ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी थेट मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडून उपमहापौरपद आणल्याची चर्चा आहे. बागुल यांना स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते, विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव आहे. महापालिकेत काँग्रेस आघाडीचे बहुमत आहे. औपचारिक निवड १५ सप्टेंबरला होणार आहे. (प्रतिनिधी)