शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्वाचा सन्मान गरजेचा

By admin | Updated: January 13, 2017 03:31 IST

समाजात स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार अशा घटना वारंवार घडत असताना मातृत्वाचा सन्मान ही अत्यंत गरजेची

पुणे : ‘समाजात स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार अशा घटना वारंवार घडत असताना मातृत्वाचा सन्मान ही अत्यंत गरजेची बाब बनली आहे. बऱ्याच मराठी कादंबऱ्यांमध्ये प्रणय, चुंबनाची बटबटीत वर्णने वाचायला मिळतात. सूचक आणि सभ्य वर्णन दुर्मिळ होत चालले आहे. मराठी साहित्यामध्ये मोजक्या लेखकांनी नायकप्रधान आणि नायिकाप्रधान कादंबरी ही संकल्पना मोडून काढली आहे’, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.दिलीप बर्वे लिखित ‘विधिलिखित’ या कादंबरीचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे आणि डॉ. मधुसूदन घाणेकर उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘जीवन जगताना आलेले अनुभव, भोगलेली वेदना हे कलाकृतींच्या निर्मितीचे मूळ असते. विधिलिखित विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाही. ही संकल्पना बुद्धिप्रामाण्यवाद्यांना पटणारी नाही. मात्र, वेदना आणि विधिलिखिताचा जवळचा संबंध असतो. या अनुबंधातून लेखन उमटत जाते. यामागील कारणमीमांसा करणे शक्य नसते. ज्या क्षणी, लेखन स्फुरते, त्यामागे माणसाचे भोगलेपण लपलेले असते. इतरांचे दु:ख कळणे आणि स्वत: भोगणे यातून नवनिर्मितीची प्रतिभा जागृत होते. त्यातून कथानक साकारत जाते.’डॉ. घाणेकर म्हणाले, ‘कोणत्याही क्षेत्रातील कलावंताचा व्यासंग निर्माण होणे गरजेचे असते. त्यातूनच कला वृद्धिंगत होते. कथा, कादंबरीतील पात्रे मार्मिकपणे रंगवणे हे लेखकाचे कौशल्य असते.’ डॉ. मृणाल धोंगडे यांनी सूत्रसंचालन केले. मोहित बर्वे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)