शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सराईत घरफोड्या गुन्हे शाखेकडून जेरबंद

By admin | Updated: January 13, 2017 03:28 IST

गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सराईत घरफोड्याला जेरबंद केले असून

पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सराईत घरफोड्याला जेरबंद केले असून, त्यांच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलिसांनी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अंकुश लक्ष्मण लष्करे (वय २९, रा. केडगाव, ता. जि. अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. घरफोडी करणाऱ्या सराइतांबाबत माहिती घेत असताना पोलिसांना लष्करेबाबत माहिती मिळाली होती. तो सध्या अहमदनगरमध्ये वास्तव्यास असून, पुण्यामध्ये घरफोड्या करतो, असे समजताच युनिट चारच्या पथकाने त्याला केडगाव परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये घरफोड्यांची कबुली दिली. निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून पुढील तपास करण्यात आला. त्याने सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच, सांगवीच्या हद्दीतील चार, निगडीच्या हद्दीतील तीन आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक, असे एकूण १३ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)लष्करे हा निगडीमधील ओटा स्किममध्ये राहण्यास होता. परंतु, काही दिवसांपासून तो पत्नी, मुलांसह नगरला गेला आहे. नगरहून रात्रीच्या वेळी पुण्यात येऊन बंद घरांची पाहणी करुन घरफोडी करण्याची त्याची पद्धत आहे. चोरी केल्यावर सकाळीच तो पसार होत असे. चोरी केलेले दागिने सराफांना विकताना तो आपला अपघात झाला होता, त्याच्या उपचारांपोटी झालेल्या कर्जामुळे दागिने विकत असल्याचे कारण द्यायचा. पुणे शहरात त्याच्याविरुद्ध यापूर्वीचे तब्बल ५० घरफोडींचे गुन्हे दाखल आहेत.