शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गाडीतळाला रस्त्यावरच भरतोय बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST

हडपसर : सोलापूर महामार्गावर हडपसर गाडीतळ ते गांधी चौकादरम्यान रस्ता वाहनचालकांना रस्ता शोधावा लागत आहे. फेरीवाले, पथारीवाले, ...

हडपसर : सोलापूर महामार्गावर हडपसर गाडीतळ ते गांधी चौकादरम्यान रस्ता वाहनचालकांना रस्ता शोधावा लागत आहे. फेरीवाले, पथारीवाले, भाजीपाला, खारी-बिस्किट, सुका-मेवा, तयार कपडे, खेळणी, अशा एक ना अनेक वस्तू विक्रेत्यांनी रस्ता व्यापला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेतील हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण नेमकी कारवाई कोणावर करतो, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

रविवारी दुपारी चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत आणि इतर दिवशी भल्या सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर खच्चून गर्दी असते. पोलीस स्टेशन आणि महापालिका क्षेत्रीय कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे. वाहतूक पोलीस चौकात उभे असतात, रिक्षावाले रस्त्यात बिनदिक्कत रिक्षा उभ्या करून थांबतात, तरी त्यांच्यावर कारवाई करण्याची कोणाही पोलीस वा पालिका अधिकाऱ्याची हिम्मत होत नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दहा महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांची वर्दळ कमी आहे. आता कोरोनाचा ज्वर कमी झाला असून, लसही बाजारात आली आहे. त्यामुळे शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्यामुळे किमान शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना मदत करावी, अशी आशा पालकवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग आणि लहान मुलांना पुणे-सोलापूर महामार्गावरून सुरक्षित ये-जा करता यावी यासाठी महापालिका प्रशासनाने पदपथ उभारले आहेत. मात्र, या पदपथाचा दुकानदार आणि फेरीवाल्यांनी सात-बाराच स्वतःच्या नावे करून घेतला आहे. त्यामुळे पदपथावरून कोणीही ये-जा करायची नाही, असा अलिखित नियमच करून टाकला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी उपबाजार ते पूलगेट दरम्यान गर्दीच्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी खाद्यपदार्थ विक्रेत्यांची आणि खवय्यांची खच्चून गर्दी असते. अर्धा अधिक रस्ता त्यांच्याच मालकीचा असतो, त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी किमान पगार मिळतो, तेवढे जरी काम केले, तर रस्त्यावरील अतिक्रमणे कमी होण्यास ९० टक्के मदत होईल, असा विश्वास अ‍ॅड. अमोल कापरे यांनी व्यक्त केला.

कोट

सोलापूर रस्त्याप्रमाणे सासवड रस्त्यावर ही वाहतूककोंडी असते. फुरसुंगी पोलीस चौकीजवळील सिंग्नलवर वाहतूक पोलीस नसतात. किमान सायंकाळी व सकाळी कार्यालयीन वेळेत येथे होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस असणे गरजेचे आहे.

- भगवान भाडळे, अध्यक्ष, कचरा डेपो हटाव संघर्ष समिती

फोटो : हडपसर येथील गाडीतळ परिसरात रस्त्यवरच बाजार भरत असल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.