शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषिकच भाषेबाबत उदासीन

By admin | Updated: June 28, 2017 04:27 IST

मराठी ही आपली मातृभाषा आहे; पण अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. ते पाहून मराठी भाषिकांना मराठीचे कितपत महत्त्व वाटते

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठी ही आपली मातृभाषा आहे; पण अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. ते पाहून मराठी भाषिकांना मराठीचे कितपत महत्त्व वाटते, असा प्रश्न पडतो, असे मत एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्वामीकृपा सभागृहात सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, पंडित वसंतराव गाडगीळ, कबीरबाग मठ संस्थेच्या डॉ. सुधा पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सुनील देवधर यांना ‘आंतरभारती पुरस्कार,’ प्रतिभा शाहू मोडक यांना ‘सहधर्मचारिणी पुरस्कार,’ माधवराव साठे यांना ‘पंडित माधवराव सप्रे स्मृती लोकमान्य पुरस्कार,’ दिनेश बर्वे यांना ‘मुद्रांजली पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.गोखले म्हणाले, ‘मराठी ही बहुसंख्येने बोलली जाणारी भाषा आहे. संख्येच्या तुलनेत मराठी भाषेचा भारतात चौथा व जगात एकोणिसावा क्रमांक लागतो. देशाची, राज्याची भाषा म्हणून मराठीचा अभिमान महत्त्वाचा आहे. इथले लोक जेव्हा परदेशात एकमेकांना भेटतात, तेव्हा ते इंग्रजीत बोलतात. पण इतर देशातले लोक परदेशात एकमेकांना भेटतात, तेव्हा ते त्यांच्याच भाषेत बोलतात. आपण छोट्या कृतींतून आपल्या भाषेचा लय करत चाललो आहोत, ही खेदाची बाब आहे. अलीकडे बऱ्याच भाषांमधील साहित्याचा अनुवाद मराठीत होत आहे, ही बाब आशादायक आहे. मराठीत चांगली ज्ञानशृंखला यानिमित्ताने येत आहे; पण ती टिकविण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे.’गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या ‘कबीर आणि महाराष्ट्र’ या चर्चासत्रात सादर झालेल्या निबंधांची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. सुनील देवधर, सुधा पंडित, प्रतिभा शाहू मोडक यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदन मुक्ता कुलकर्णी-गरसोळे यांनी केले.