शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांचा अडीचशेवा ‘दिल्ली विजय दिन’ होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठ्यांच्या दिल्ली विजयाला १० फेब्रुवारीला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. पानिपतनंतरच्या मराठ्यांच्या ‘दिल्ली विजय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठ्यांच्या दिल्ली विजयाला १० फेब्रुवारीला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. पानिपतनंतरच्या मराठ्यांच्या ‘दिल्ली विजय दिना’चा हा अडीचशेवा सोहळा रविवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा सभागृहात साजरा केला जाणार आहे. हिंदुत्ववादी, शिवप्रेमी अशा विविध ३७ संस्था-संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

मध्य प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री यशोधराराजे शिंदे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. ११) ही माहिती दिली. विक्रमसिंह मोहिते, विजय दरेकर व मोहन शेटे उपस्थित होते.

बलकवडे म्हणाले की, आजच्या पिढीला जाज्वल्य इतिहासाची आणि आपल्या शौर्याची माहिती व्हावी, म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णी व मी स्वत: या सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून बोलणार आहोत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत, महेंद्र पेशवा, भूषण होळकर, डॉ. अतुल बिनीवाले यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

“मराठ्यांच्या फौजांनी १७७१ मध्ये पानिपताचा बदल घेत पानिपत, सोनपत, बागपत, कुंजपुरा, शामली, फत्तरगड, घोसगड आणि नजिबाबाद जिंकून घेतले. नजीबखानने पानिपतात लुटलेली तीस लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी पुन्हा मिळवली. शेकडो मराठा स्त्रियांना मुक्त केले. नजीबखानाची कबर उखडून गंगेत मिसळून मराठ्यांनी पानिपताचा बदला पूर्ण केला. यामुळे अब्दालीला पुन्हा हिंदुस्थानात येण्याची हिंमत झाली नाही,” असे बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

दिल्लीवर मराठ्यांच्या कब्ज्यात

“१४ जानेवारी १७६१ या दिवशी पानिपतात परकीय अब्दालीविरुद्ध झालेल्या संघर्षात एक लाख मराठ्यांनी बलिदान देऊन देशाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. युद्धात जरी अब्दालीचा विजय झाला असला तरी ध्येयामध्ये मराठे विजयी झाले. कारण त्यानंतर अब्दाली पुन्हा कधीही दिल्लीपर्यंत येऊ शकला नाही. जनरल लेक याने आपल्या दिल्ली विजयाच्या इतिहासात लिहून ठेवले आहे की, दिल्ली आम्ही मुघलांशी नव्हे तर मराठ्यांशी लढून जिंकली,” या शब्दांत पांडुरंग बलकवडे यांनी विजयदिनासंबंधीचा इतिहास सांगितला.

चौकट

मराठ्यांनी जिंकला लाल किल्ला

“पानिपतानंतर अब्दालीचा हस्तक नजीबखान रोहिला दिल्लीवर कब्जा करुन होता. परकीय आक्रमणापासून दिल्ली आणि हिंदुस्थानचे रक्षण करणारा कोणी नव्हता. त्याचा फायदा घेत इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया देशात घातला. एवढेच नव्हे तर शाहआलम बादशहाला पाटण्यात नजरकैद केले. त्यावेळी बादशहाने माधवराव पेशवे व महादजी शिंदे यांच्याशी संधान बांधून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवण्याची विनंती केली. माधवरावांनी हे आव्हान स्विकारले, मराठ्यांच्या फौजा दिल्लीकडे रवाना झाल्या. हे समजताच घाबरलेल्या नजीबखानने मराठ्यांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. पण मराठ्यांनी तो झिडकारला. ८ फेब्रुवारी १७७१ मध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकली. १० फेब्रुवारी १७७१ रोजी मराठ्यांनी लाल किल्ला जिंकून शिवरायांचा भगवा त्यावर फडकवला,” असे पांडुरंग बलकवडे यांनी नमूद केले.