लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हिंजवडी आयटी पार्क फेज एकमधील माप्लो इंडिया प्रा.लि. कंपनीच्या विरोधात कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने मंगळवारी कामगारांनी कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.काही दिवसांपासून बेमुदत उपोषण करणाऱ्या कामगारांची प्रकृती ढासळत असूनही पोलीस प्रशासन व कामगार आयुक्त कार्यालयाकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे प्रकृती खराब झालेल्या कामगारांसह इतर कामगारांनी कामगार आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. कंपनीकडून कामगारांची पिळवणूक केली जात असताना कामगार आयुक्तांकडून न्याय मिळत नसल्याची खंत टे्रड युनियनचे अध्यक्ष संजय मगदूम यांनी व्यक्त केली.कंपनीतील जुन्या कामगारांची दखल न घेता कंपनीने कंत्राटी कामगारांची भरती सुरू करून काम सुरू केल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामगारमंत्र्यांनी यात लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी मगदूम यांनी केली आहे.
माप्लो कामगारांचे आंदोलन
By admin | Updated: May 24, 2017 04:30 IST