जेजूरी : बायकोचे मणीमंगळसुत्र मोडून पाणीपट्टी भरली, मात्र पाणी मिळाले नाही, असा संताप पुरंदर उपसा योजनेच्या लाभार्थी शेतक:यांनी आज झालेल्या बैठकीत व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नाझरे जलाशयावर झालेल्या या बैठकीत शेतक:यांनी योजनेच्या नियोजनावर रोष व्यक्त केला. त्यामुळे पुण्यात सिंचन भवन येथे बैठक घेऊ असे आश्वासन देत सुळे यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.
पुरंदर उपसा योजनेच्या नियोजनासाठी आज ही बैठक घेण्यात आलली होती. बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कायर्कारी अभियंता व्ही.बी.जाधव, नीरा पाटबंधारे विभागाचे दिगंबर दुबल, शाखा अभियंता शहाजी सस्ते माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते, जालिंदर कामठे, सुदाम इंगळे, पोपट थेऊरकर, बबूसाहेब माहूरकर, जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, सारिका इंगळे, पंचायत समिति उपसभापती माणिक ङोंडे, सदस्या अंजना भोर, गौरी कुंजीर, शिवाजी पोमण, संग्राम सस्ते, योगेश फडतरे तसेच भोसलेवाडी, बेलसर, काळेवाडी, दिवे, सोनोरी,गुरोळी, राणमळा, आंबळे, पिसर्वे, मावडी पिंपरी, जवळार्जून, मावडी क.प., नाझरे, जेजूरी, धालेवाडी, कोथळे, कोळवीहीरे, नावळी आदि पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्नातील गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
एक शेतकरी म्हणाला, ‘‘ माङयासोबत गावातील चार-पाच शेतक:यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी बायकोचे मंगळसुत्र मोडले. मात्र, पैसे भरूनही पाणी मिळालेच नाही. ’’
आपल्या समस्या मांडताना शेतकरी म्हणाला, ‘‘पुरंदर उपसा योजनेतून पाणी मागितल्यास अधिकारी पैसे भरण्याची सक्ती करतात. पैसे भरले तरी पाणी मात्र मिळत नाही. त्यामुळे आमच्यासाठी ही योजना असून नसल्यासारखीच आहे. ’’
फोन केले तर अधिकारी घेत नाहीत. पदाधिका:यांनाही टाळण्याचे काम करतात. प्रत्येक आढावा बैठकीत केवळ आकडेवारी मांडली जाते, वस्तुस्थिती वेगळीच असते, शेतक:यांची दिशाभूल करतात. योजनेत अनेक त्रुटी आहेत. अधिकारी पैसे स्वीकारतात मात्न पावती देत नाहीत, असे आरोप शेतक:यांनी केले. त्यामुळे बैठकीत गोंधळ सुरू झाला. गोंधळ वाढू लागल्याने त्यांनी पुरंदर मधील पाणी टंचाई व लांबलेल्या पावसामुळे संभाव्य दुष्काळाची चिंता असून या संदर्भात पुढील आठवडय़ात जलसंपदा मंत्नी शशिकांत शिंदे यांच्या समवेत सिंचन भवन येथे येथील शेतकरी प्रतिनिधी समवेत बैठक घेऊ असे आश्वासन देत बैठक संपवण्यात आली.
खा.सुळेची मीडिया वर टीका
बैठकीत एका शेतक:याने वतर्मान पत्नातील बातम्यांचा संदर्भ देत पुरंदर उपसा योजने संदर्भात प्रश्न विचारला असता खासदार सुळे संतप्त झाल्या. ‘‘ मी कधी ही वतर्मानपत्रे वाचत नाही. पत्नकारितेवर माङो राजकारण कधीच नाही,तुमच्यावर आहे. गेल्या 2क् वर्षापासून माध्यमे शरद पवार यांच्यावर यांच्यावर खालच्या पातळीवरून टीका करीत आहेत, त्यांना साहेबांच्या विरोधात चिंधी ही सापडलेली नाही.’’अशा शब्दात त्यांनी टीका केली. ही टीका पाहून स्थानिक नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)
पाणीपट्टीत भरमसाट वाढ
गेल्या वर्षी एक दशलक्ष घनफुट पाण्यासाठी 21 हजार 9क्क् रुपये पाणीपट्टी आकरण्यात आली होती, या वर्षी ती वाढवून 49 हजार करण्यात आली. भरमसाठ वाढवलेली ही पाणी पट्टी परवडणारी नाही, असे
शेतक:यांनी सांगितले.
4पाणी बारामतीतील काही गावे नव्याने समाविष्ट करून त्यांना पुरंदर उपसा योजनेचे पाणी देण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, पुरंदर मधील मावडी क.प., कोळविहिरे, नावळी ही गावे अनेक वर्षापासून योजनेचे पाणी देण्याची मागणी करीत आहेत. त्यांच्यासाठी कृष्णा खोरे महामंडळात केवळ जुजबी ठराव करण्यात आला आहे. इतर गावांची पाण्याची तहान भागल्यासच या गावांना पाणी देण्यात येईल, असे सांगिण्यात आले आहे. मात्र, बारामतीतील गावांसाठी जलवाहिनीचे कामही सुरू झाले. त्यामुळे या गावांना प्रथम अधिकृत पाणी का दिले जात नाही असा प्रश्न शेतक:यांनी विचारला. त्यामुळे सुप्रिया सुळे संतप्त झाल्या.