रेडणी : हिवताप जनजागरण मोहिमेंतर्गत शहाजीराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांना कीटकजन्य आजारांविषयी प्राथमिक आरोग्य केंद्र रेडणीतील आरोग्यसेवक एम. एस. गोरे यांनी माहिती दिली.धूर फवारणी यांसारख्या उपायोजनांमुळे डासांची वाढ रोखता येते. घरात मच्छरदानीचा, डासरोधक अगरबत्तीचा वापर करण्याने या आजारांपासून बचाव करता येतो. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांपासून या उपायांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन, डॉ. पिसे, डॉ. जाधव यांनी केले. (वार्ताहर)
रेडणीत हिवताप जनजागृती
By admin | Updated: August 4, 2014 04:15 IST