शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

स्मार्ट बनण्याच्या नादात मुलांना एकलकोंडेपण

By admin | Updated: November 16, 2015 01:51 IST

सध्याची लहान मुलं स्मार्ट आहेत. पाचव्या, सहाव्या वर्षापासून कॉम्प्युटर आणि मोबाइल सहजपणे हाताळणं, फाडफाड इंग्रजी बोलणं, टीव्हीवरच्या डान्स किंवा कॉमेडी शोमध्ये भाग घेणं,

शिवप्रसाद डांगे,  रहाटणीसध्याची लहान मुलं स्मार्ट आहेत. पाचव्या, सहाव्या वर्षापासून कॉम्प्युटर आणि मोबाइल सहजपणे हाताळणं, फाडफाड इंग्रजी बोलणं, टीव्हीवरच्या डान्स किंवा कॉमेडी शोमध्ये भाग घेणं, अशीच स्मार्ट असण्याची परिभाषा आहे. ही मुले तासन्तास घरात टीव्ही व संगणकाच्या समोर बसून राहत आहेत. खरे तर शहरात सुरक्षेच्या कारणाने पालक मैदानी खेळ खेळण्यासाठी मुले बाहेरच पडू देत नाहीत. त्यामुळे स्मार्ट बनण्याच्या नादात मुलं एकलकोंडी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. स्मार्ट म्हणजे बुद्धिमान किंवा शहाणा नव्हे. हल्लीच्या परिभाषेत स्मार्ट असणं म्हणजे ‘चमको’ असणं. चारचौघांत इतरांपेक्षा उठून दिसणं. समाजात सहजपणे मिसळता येणं, कुणाशीही सहज बोलता येणं वगैरे. हल्लीच्या १0-१२ वर्षांच्या मुलांना हे सगळं करता येतं. इतकंच काय, याच वयात ती मोठ्यांप्रमाणे कपडे आणि केसांच्या फॅशन्स करण्यातही तरबेज बनतात. उदार पालक आणि समाजामुळे ते अमाप स्वातंत्र्य उपभोगत आहेत. त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि शिक्षण कमालीचे सोपं केले आहे. ते सहज उपलब्धही होते. उच्च शिक्षणाची संधीही सहजपणे मिळते. मात्र, एवढे सगळं मिळून या पिढीला दैनंदिन जीवनातले साधे-सोपे हिशेब, बेरीज आणि वजाबाकी तोंडी करता येत नाही. त्यासाठी कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागते. अर्थात डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि मॉलच्या कॅश काउंटरवरील तरुण कर्मचाऱ्यांचेही काम कॅल्क्युलेटरविना चालत नाही. या पिढीच्या ह्यस्मार्टनेसह्णमधलं हे मोठंच उणं आहे. त्याचा सगळा आत्मविश्वास टेक्नॉलॉजी आणि तिचा पालकांनी चालवलेले बेसुमार लाड यांच्या खांबावर उभा आहे. त्याला स्वत: मिळविलेल्या ज्ञानाचा आणि कर्तबगारीचा पाया नाही. अनेक मुलांचे पालक आयटी, कॉपोर्रेट किंवा मल्टिनॅशनल कंपन्यांतून भरपूर पैसा मिळवतात. मुलांना उच्च राहणीमान, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, भरपूर पॉकेटमनी आणि मनमुराद स्वातंत्र्य याचा लहानपणापासून लाभ मिळतो. पालक, कोचिंग क्लासेस, इंटरनेट यांच्यामुळे सारे काही हाताशी असतं. सारं काही सहज मिळत असल्यामुळे त्यांच्यात स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची कुवत नसते. संघर्ष, अनुभव आणि परिश्रम यांच्याविना मिळालेल्या सुख-सोयींमुळे या पिढीला योग्य वयातही स्वत:चे निर्णय स्वत:ला घेता येत नाहीत. अति जपल्यामुळेही अशी मुले व्यवहारज्ञानातही कच्ची राहतात.अलीकडे देशात वाढलेला दहशतवाद, खंडणीकरिता लहान मुलांचे अपहरण, लैंगिक शोषण व अत्याचार या विकृतीमुळे आजच्या लहान मुलांच्या आयुष्यावर भीतीचं सावट आहे. चार-पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि नंतर हत्या असेही भीषण प्रकार चालू आहेत. रेसिडेन्शियल स्कूलच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांनाही लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. मिळणाऱ्या सुबत्ता व स्वातंत्र्याला ग्रहण लागले आहे. दहा वर्षांच्या मुलामुलींनाही संध्याकाळी जाऊन खेळणं किंवा सोसायटीच्या आसपास मोकळी जागा असल्यास तिथे एकत्र जमणं, गप्पा मारणं यांसारख्या साध्या गोष्टीचा आनंद मिळणं दुरापास्त झाला आहे. संगणक, व्हिडीओ गेम्स, टीव्हीच्या आहारी गेलेल्या आणि सामाजिक जीवन हरवून बसलेल्या या पिढीला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सामान्यज्ञान, व्यवहारज्ञान, सामाजिक जीवन यांना आजची पिढी पोरकी होत आहे. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे.काही वर्षांपूर्वी घरातलं धान्य गिरणीतून दळून आणणं, किरकोळ किराणा, भाजी खरेदी ही कामं मुलंच करत असत. नातलगांना निरोप पोहचवण्याचं कामही १४-१५ वर्षांच्या मुलांवर सोपवलं जात असे. अशा कामातून मुलांना जीवनशिक्षण मिळत असे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच हे व्यवहारी ज्ञानही मुलांना संस्कारक्षम वयात मिळायला हवं. चैन, हौसमौज, ऐश-आराम हे सारे काही दिले आहे. पण, निसर्गाच्या सान्निध्यातील खेळापासून नवी पिढी वंचित आहे. त्यामुळे व्यक्तिगत विकासात त्यांना अडचण येते. असुरक्षिततेच्या छायेत ते वावरतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात स्थानबद्ध होत असल्याने मुलं स्मार्ट होताहेत; पण स्वावलंबी नाही.