पुणो : गेल्या वर्षी जून महिन्यात उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या ठिकाणी ढगफुटी झालेली असताना, नागरिकांना यात्रेसाठी जाण्यास इतर मार्ग उपलब्ध होते, अशा शब्दांत प्रवाशांना निम्म्यातूनच परत आणून रक्कम परत न करणा:या ट्रॅव्हल्स कंपनीला ग्राहक मंचाने फटकारले आहे. जयश्री टूर्स यांनी ग्राहकाकडून घेतलेले 95 हजार 2क्क् रुपये आणि मानसिक व शारीरिक भरपाई म्हणून 5 हजार आणि तक्रारीचा खर्च म्हणून 2 हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने दिला.
येरमाळकर दाम्पत्याला जून 2क्13 मध्ये चारधाम यात्र करायची होती. त्यांनी 18 ते 29 जूनदरम्यान जयश्री टूर्सकडे प्रत्येकी 36 हजार रुपयांचा चेक दिला होता. या यात्रेत एकूण चौदा जण सहभागी झाले होते. तसेच, केदारनाथची यात्र करण्यासाठी तक्रारदारांनी हेलिकॉप्टरसाठी 21 हजार रुपये अतिरिक्त दिले होते.
मात्र, चारधाम यात्रेच्या ठिकाणी ढगफुटी व प्रचंड पाऊस झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे ग्राहकांनी जयश्री टूर्स यांना ही सहल रद्द करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी अन्य मार्गाने यात्र पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. पुणो व दिल्ली विमानतळावर येणा:या बातम्या पाहून ग्राहकांनी यात्र रद्द करण्याबाबत पुन्हा-पुन्हा विनंती केली. त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. हरिद्वार येथे मुक्कामाला पोहोचल्यानंतर जयश्री टूर्सच्या सहल व्यवस्थापकांनी चारधाम यात्र बंद असल्याचे सांगून जवळची पर्यटनस्थळे पाहण्यास सांगितले. दोन दिवसांनी त्यांना परत दिल्ली आणि नंतर पुण्यात परत आणले.
यात्र पूर्ण न केल्यामुळे, ग्राहकांनी ट्रॅव्हल्स कंपनीकडे सहल आणि विमानाचा खर्च वजा करून, इतर रक्कम परत देण्याची विनंती केली. कंपनीने त्यांची मागणी फेटाळल्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. कंपनीने ग्राहकांना सदोष सेवा दिल्याचे सिद्ध होत असल्याचे मंचाने आदेशात नमूद केल़े
4ट्रॅव्हल्स कंपनीला पर्यटनाचा अनेक वर्षाचा अनुभव असून, यात्रेतील अडचणींची माहिती असूनही पर्यटकांना भयावह परिस्थितीला सामोरे जाण्यास भाग पाडले, असे मत ग्राहक मंचाने निकालात नोंदवले असून, पर्यटकांकडून घेतलेली रक्कम परत करण्याचा आदेश दिला आहे.