शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मल्लाव खूनप्रकरणी मुख्य सूत्रधारांना अटक

By admin | Updated: September 2, 2016 05:37 IST

नगरसेवक महेंद्र मल्लाव खूनप्रकरणी आज संध्याकाळी मुख्य सूत्रधार कुर्लप बंधूंनाअटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी दिली.

शिरूर : नगरसेवक महेंद्र मल्लाव खूनप्रकरणी आज संध्याकाळी मुख्य सूत्रधार कुर्लप बंधूंनाअटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी दिली. रविवारी (दि. २८) दुपारी भर बाजारपेठेत मल्ला यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला होता. याप्रकरणी सोमवारी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड (मोशी नाका) येथून चौघांना अटक केली होती. प्रवीण काळे, विशाल काळे, सनी यादव व रूपेश लुनीया यांना अटक केल्यानंतर दोन दिवसांनंतर अजय जाधव यास अटक करण्यात आली. या हत्या प्रकरणात नीलेश कुर्लप व गणेश कुर्लप हे सूत्रधार असल्याचे मल्लाव कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. उपरोक्त पाच जणांबरोबर कुर्लप बंधूंवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच जणांच्या अटकेनंतर सूत्रधारांना अटक करावी, अशी मल्लाव कुटुंबीयांची मागणी होती. आज उपविभागीय अधिकारी मोरे यांनी मल्लाव यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे जवाब घेतले होते. कुर्लप बंधूंच्या अटकेसाठी रविवारपासूनच पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, आज सायंकाळी कुर्लप बंधूंना अटक करण्यात आली. आरोपींनी खुनाची कबुली दिल्याचे मोरे यांनी सांगितले. प्रथम अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने ९ सप्ट्ेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.- रविववारी घटना घडली. संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी संयम ढळू न देता शांततेत हे प्रकरण हाताळले. परिणामी, चारच दिवसांत सर्व आरोपी जेरबंद करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. दरम्यान, अजूनही गावात मल्लाव यांच्या खुनाची चर्चा आहे. गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना मल्लाव यांच्या खुनाची घटना घडली. या पार्श्वभूमीवर या गणेशोत्सवात पोलिसांना दक्ष राहावे लागेल.