शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकपर्यंत

By admin | Updated: May 28, 2016 04:21 IST

बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक धायगुडेवस्ती येथील अल्पवयीन मुलीची पूजेसाठी मागणी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकापर्यंत पोहोचले आहेत. पोलीस त्याच्या मागावर

मोरगाव : बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक धायगुडेवस्ती येथील अल्पवयीन मुलीची पूजेसाठी मागणी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचे धागेदोरे कर्नाटकापर्यंत पोहोचले आहेत. पोलीस त्याच्या मागावर आहेत, तर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांना दि. ३० मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, पूजाप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे.तरडोली येथील मुलीची अघोरी पूजा व पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सहा फूट उंच मुलीची मागणी करण्यात आली होती. याचा सूत्रधार पुणे शहरात काही दिवसांपूर्वी वास्तव्यास होता. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्नाटकातील मूळ गावी असल्याची चर्चा सध्या या भागात आहे. शुक्रवारी (दि.२७) संबंधित अल्पवयीन मुलगी व तिच्या आईस संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांनी बोलावले होते. या वेळी संबंधित प्रकार सांगताना मुलीला अश्रू अनावर झाले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी तपासाची सूत्रे जाधव यांच्याकडे दि. २५ मे रोजी सोपविली. अल्पवयीन मुलीस अघोरी पूजा करण्यासाठी मागणी केली जात असल्याबाबतची तक्रार वडगाव पोलिसांकडे मुलीच्या काकांनी व पालकांनी केली होती. तक्रार दाखल केल्यानंतरदेखील गुन्ह्यातील सर्व आरोपींना दि. २४ मे रोजीच केवळ जबाब घेऊन सोडल्याने, या भागात तीव्र संताप व्यक्तहोत होता. याबाबत दिरंगाई केल्याने शिंदे यांच्याकडील तपास काढून घेण्यात आला आहे. (वार्ताहर)आणखी प्रकार उजेडात येणार : आरोपींना ३0 मेपर्यंत पोलीस कोठडी1मुख्य आरोपी सध्या पुणे येथे राहत आहे. तो कारवाईच्या भीतीने कर्नाटकाकडे गेला असल्याची माहिती उजेडात येत आहे. यामुळे बारामती तालुक्यात अघोरी पूजा व पैशांचा पाऊस चर्चेचा विषय बनला आहे. कर्नाटकाकडे पलायन केलेला मुख्य आरोपी ताब्यात आल्यास, आणखी इतर प्रकार उजेडात येण्याची शक्यता आहे.2दरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी नाना मारुती कोळेकर, दिगंबर बापूराव भापकर, महादेव बाजीराव भापकर, भाऊसाहेब गेनबा सोनवलकर, पोपट शिवराम नाळे, विकास दादाराम मोहिते या सहा जणांना बारामती न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर आज उभे केले होते. त्यांना दि.३० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.