शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पुन्हा येणार महिलाराज

By admin | Updated: February 4, 2017 04:16 IST

मुंबईमध्ये शुक्रवारी ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली, त्यामध्ये पुणे महापालिकाचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे.

पुणे : मुंबईमध्ये शुक्रवारी ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली, त्यामध्ये पुणे महापालिकाचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे अडीच वर्षांनी पुन्हा महिलेच्या गळ्यात पुण्याच्या महापौर पदाची माळ पडणार असल्याचे निश्चित झाले आहे.आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. महिलेसाठी महापौर पद आरक्षित झाल्याची बातमी कळताच महिला उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुंबईमध्ये मंत्रालयातील सभागृहात ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.प्रभागांची रचना जाहीर केल्याबरोबरच महापौर पदाची आरक्षणे जाहीर केली जातात. यंदा आॅक्टोबर २०१५ मध्ये प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली, मात्र महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली नव्हती. महापालिकेच्या आरक्षणाची सोडत कधी निघणार, याची इच्छुकांकडून सातत्याने निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली जात होतीे. अखेर शुक्रवारी महापौर पद कुठल्या प्रवर्गासाठी राखीव असणार याचा सस्पेन्स संपला.ज्या प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित होईल, त्या प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडे भावी महापौर म्हणून पाहिले जाते. त्यामुळे यापूर्वी महापौर पदाचे गाजर दाखवून अनेक पक्षांतरेही घडवून आणली जात होती. मात्र, यंदा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आरक्षण निश्चित होणार असल्यामुळे याचा वापर राजकीय पक्षांना करता आलेला नाही. (प्रतिनिधी)पुणे महापालिकेचे महापौरपद २००७ मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होते. त्यावेळी राजलक्ष्मी भोसले या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर सर्वसाधारणचे आरक्षण पडले होते. पुण्याचे महापौरपद आतापर्यंत अनुसूचित जमातीसाठी अद्यापी एकदाही राखीव राहिलेले नाही. त्यामुळे हे आरक्षण पडेल, असा अनेकांचा कयास होता. मात्र, यावेळेसही सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. दहा वर्षांनंतर पुन्हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे.