शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगावकरांना महावितरणचा ‘शॉक’

By admin | Updated: June 15, 2016 04:56 IST

नारायणगाव येथील विद्युत वीज वितरण कंपनीने नेमणूक केलेल्या एजन्सीने चुकीचे व अंदाजे रीडिंग घेतल्याने अनेक ग्राहकांना वीजबिलांचा झटका बसला आहे. वाढीव बिले आल्याने

नारायणगाव : नारायणगाव येथील विद्युत वीज वितरण कंपनीने नेमणूक केलेल्या एजन्सीने चुकीचे व अंदाजे रीडिंग घेतल्याने अनेक ग्राहकांना वीजबिलांचा झटका बसला आहे. वाढीव बिले आल्याने या गैर कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.वीज वितरण कंपनीने वीजमीटर बिलाचे रीडिंग घेण्यासाठी नव्याने एजन्सीची नियुक्ती केलेली आहे़ या एजन्सीकडून नियुक्त केलेले कर्मचारी मीटर रीडिंग व्यवस्थित घेत नसल्याने अनेक ग्राहकांना चुकीची व सदोष बिले आलेली आहेत़ बिलदुरुस्तीसाठी नारायणगावपासून २ कि़ मी़ अंतरावर असलेल्या कार्यालयात जावे लागते़ तेथे गर्दी असल्याने तास-दोनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या एजन्सीने अनेक मीटरचे रीडिंगच घेतलेले नाही़ त्यामुळे अंदाजे व सरासरीनुसार मीटर रीडिंग घेण्यात आलेले आहे. कमी रीडिंग, तर कधी जास्त अशा स्वरूपात बिले आलेली आहेत़ नारायणगाव येथील एक ग्राहक अशोक भराडिया यांचे जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यानच्या बिलांवर मीटर रीडिंगचा फोटोच घेण्यात आलेला आहे़ एप्रिल २०१६ मध्ये वापरलेल्या एक महिन्याच्या घरगुती लाइटबिलाचे बिल ९,७९० रुपये आलेले आहे़ एक महिन्यात ८०३ युनिट वापर केल्याचे लाइटबिलात दाखविण्यात आले आहे़ यापूर्वीच्या बिलांमध्ये साधारणपणे ९० ते १५० दरम्यान युनिटचा वापर दाखविण्यात आला आहे़ मात्र, एप्रिलच्या बिलामध्ये ८०३ युनिटचा वापर दाखविल्याने त्यांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे़ ग्राहकांना चुकीचे रीडिंग आले असल्यास आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत रीडिंग व्यवस्थित घेतले आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येईल़ मीटर रीडिंग घेण्याचे काम एजन्सीला देण्यात आलेले आहे़ एजन्सीने चुकीचे रीडिंग घेतले असल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल़ तसेच, ज्या ग्राहकांना चुकीची बिले आलेली आहेत, त्यांनी नारायणगाव कार्यालयाशी संपर्क साधावा.- विवेक सूर्यवंशी, उपकार्यकारी अभियंता, नारायणगाव