शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन होणार बेघर

By admin | Updated: June 7, 2016 21:09 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन (एमओए)वर बेघर होण्याची वेळ आली आहे.

शिवाजी गोरे, पुणेमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन (एमओए)वर बेघर होण्याची वेळ आली आहे. सध्या संघटनेचे कार्यालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये असून, ते धोकादायक बनले असल्याचा अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिका फ क्षेत्रीय कार्यालयाने दिल्यामुळे कार्यालय मोकळे करण्याची नोटीस संघटनेला देण्यात आली आहे.तर, दुसरीकडे एमओएने राज्याच्या क्रीडा विभागाला शिवछत्रपती क्रीडासंकुलात कार्यालयासाठी जागा देण्याबाबत जानेवारी महिन्यात मागणी अर्ज केला असून, त्या पत्राला क्रीडा विभागाने केराची टोपली दाखविली. अद्याप जागा देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कार्यालय कुठे करायचे, हा प्रश्न संघटनेला पडला आहे. सत्ताबदल होताच, संघटनेला डावलण्याचे कारस्थान सुरू असल्याची चर्चा राज्याच्या क्रीडाक्षेत्रात रंगली आहे.पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमचे बांधकाम ३७ वर्षांपूर्वी म्हणजे १९७९मध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून त्याची पाहणी एप्रिल महिन्यात करण्यात आली. ही पाहणी वास्तुविशारदाकडून करण्यात आली आहे. त्यांनी त्यांचा अहवाल ३ जून २०१५ रोजी पीसीएमसीकडे सादर केला आहे. या अहवालात मगर स्टेडियमची डागडुजी ताबडतोब करण्यात यावी. कारण हे बांघकाम जुने झाले अजून केव्हाही काहीही होऊ शकते. त्या स्टेडियमचे स्लॅब, पिलर, छत, भिंती या सर्व कमकुवत झाल्या आहेत. या बांधकामाचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा, मोठी हाणी हाऊ शकते. कारण तेथे काही कार्यालयेसुद्धा आहेत. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमओएच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात पाहणी करून एमओएच्या कार्यालयासाठी जागासुद्धा निश्चित केली होती. त्या वेळी आर्किटेक्टला बोलावून त्यांच्यामार्फत प्लॅनसुद्धा तयार करण्यात आला होता. पण, आघाडी सरकार जाऊन युती सरकार आल्यानंतर क्रीडासंकुलात एमओएचे कार्यालय बांधण्याच्या नियोजनाला युती सरकारने खो देत असल्याचे बोलले जात आहे. क्रीडा खात्याकडे एमओएने शिवछत्रपती क्रीडासंकुलात कार्यालयासाठी जागा मिळावी म्हणून जानेवारी महिन्यात पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचे उत्तर अजूनपर्यंत मिळालेले नाही. या संदर्भात क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबरसुद्धा चर्चा झालेली आहे; पण पुढे कोणतीच हालचाल झालेली नाही. पीसीएमसीकडून एमओएला कार्यालय मोकळे करण्याची नोटीससुद्धा मिळालेली आहे. मी रविवारी आमचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली आहे. त्यांना ‘क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याशू चर्चा करतो,’ असे सांगितले. -बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस, एमओएमहाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचा कार्यालयासाठी जागा मिळण्याबाबतचा अर्ज क्रीडा खात्याला मिळलेला आहे. असे महत्त्वाचे निर्णय मंत्रालयात होतात. आम्ही त्यांचा अर्ज सचिवांकडे पूर्वीच पाठविला आहे. मंत्रालयातून अजून काही त्याचे उत्तर आलेले नाही.- नरेंद्र सोपल, सहसंचालक, क्रीडा विभाग