Maharashtra Election 2019 : 'Victory' rally before candidates' results in Pune | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यात दोन उमेदवारांचा निकालाआधीच 'विजयी' जल्लोष  
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यात दोन उमेदवारांचा निकालाआधीच 'विजयी' जल्लोष  

ठळक मुद्देमहाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी सर्वत्र मतदान झाले.आश्चर्याचा झटका देणारा प्रकार पुण्यात झळकल्याने चर्चेचा विषय

पुणे :  ह्याला विजयाचा आत्मविश्वास म्हणावं की 'अति'आत्मविश्वास..पण हे घडलं आहे विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात..मतदान प्रक्रिया संपवून काही तासच उलटले असताना या उमेदवारांनी आणि निकालाला अजून २ दिवस शिल्लक आहे . मात्र, या दोन ' माननीय' उमेदवारांच्या समर्थकांनी चक्क आपापल्या नेत्यांच्या विजयाचे फ्लेक्स लावत आणि मिरवणूक काढत जोरदार आताषबाजी केली आहे.त्या 'माननीय' स्वयंघोषित विजयी उमेदवारांची नावे खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील कांबळे. अशी आहेत.  ही ''आगाऊ '' फ्लेक्स बाजी पाहून चर्चांना उधाण आले नसते तरच नवल.. 


 महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी सर्वत्र मतदान झाले. त्याचा निकाल गुरुवारी ( दि. २४ ) लागणार आहे. त्यादिवशी मतमोजणी झाल्यानंतर अधिकृत विजयी उमेदवाराची घोषणा होते. मात्र हा आश्चर्याचा झटका देणारा प्रकार पुण्यात झळकल्याने सर्वठिकाणी चर्चेचा विषय ठरले आहे.दोन्हीही उमेदवार प्रथमच आपआपल्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
सचिन दोडकेंच्या विरोधात खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर तर सुनील कांबळे यांच्यासमोर काँग्रेसचे रमेश बागवे यांचे आव्हान आहे.


Web Title: Maharashtra Election 2019 : 'Victory' rally before candidates' results in Pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.