शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकर येथे महारूद्र स्वाहाकार

By admin | Updated: April 21, 2017 05:59 IST

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चार दिवसांचा महारूद्र स्वाहाकार व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. संस्थानच्या वतीने दिला जाणारा

भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चार दिवसांचा महारूद्र स्वाहाकार व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. संस्थानच्या वतीने दिला जाणारा ज्योतिर्लिंग पुरस्कार या वर्षी अथर्ववेद पंडित देशिक शास्त्री नारायण कस्तुरे व हभप विश्वनाथमहाराज लवकरे श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर यांना देण्यात आला. विश्वात सुख, समृद्धी व शांतता राहावी यासाठी येथील ग्रामस्थ चार दिवस रूद्र स्वाहाकाराचा कार्यक्रम आयोजित करतात. या वर्षी दि. १७ ते २० एप्रिलदरम्यान हा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे हे ३९ वे वर्ष होते. स्वाहाकार काळात मंदिर चोवीस तास उघडलेले असते. शिवलिंगावर संतत जलधारा व महारूद्र पठण सुरू असते. दररोज होमहवन, रूद्राभिषेक, प्रवचन, आरती, महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. या वर्षी योगेश गवांदे हे रूद्र स्वाहाकारासाठी यजमान म्हणून बसले होते. या कार्यक्रमासाठी चिंचवड, नरसोबाचीवाडी, आळंदी अशा अनेक धार्मिक स्थळांचे ब्रह्मवृंद येतात. चार दिवस होणाऱ्या या कार्यक्रमात दररोज महाप्रसाद असतो. या महाप्रसादासाठी भीमाशंकर परीसरातील गावांमधून धान्य गोळा केले जाते. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी पूर्णाहुती स्वाहाकार होऊन पालखी सोहळा निघतो. याही वर्षी उत्साहात पालखी सोहळा झाला. पालखी भीमाशंकर मंदिरापासून तर कोकणकडा व तेथून कमलजामाता मंदिरात आणली जाते. येथे महाआरती होऊन सांगता होते. या वेळी उपकार्यकारी विश्वस्त सुरेश कौदरे, वेदमूर्ती मधुकर गवांदे, विश्वस्त रत्नाकर कोडिलकर, पुरुषोत्तम गवांदे गुरुजी, प्रशांत काळे, दत्तात्रय कौदरे, चंद्रकांत कौदरे, गणपत कौदरे, रामचंद्र शिर्के इत्यादी उपस्थित होते.