शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महागणपती सुवर्ण अलंकार व फुलांची सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:31 IST

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वा.श्रींची अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने ...

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वा.श्रींची अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली.

देवस्थानच्या वतीने दु.१२ वा. महापुजा व महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आल्याचे विश्वस्त प्रा.नारायण पांचुदकर यांनी सांगितले. दर चतुर्थी प्रमाणे याही चतुर्थीला प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने श्री महागणपतीला अर्पण करण्यात आलेल्या फुलांची मंदिर व परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असे ऍड विजयराज दरेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली प्रमाणे नियमांचे पालन व्हावे तसेच लॉकडाऊनच्या कालखंडानंतर पहिलीच संकष्ट चतुर्थी असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.चतुर्थीचे औचित्य साधून साईदीप मोल्डिंग इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्याकडून ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सर दोन मशीन देवस्थान ट्रस्ट देण्यात आल्या. तसेच एका गणेश भक्ताकडून मंदिर परिसरात १ हजार पणत्या लावण्यात आल्या. यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ.संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

--

भाविकांची थर्मल चाचणी करुनच प्रवेश

लॉक डाऊन नंतर १६ नोव्हेंबर रोजी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले त्यानंतरच्या पहिल्या चतुर्थीला भाविकांचा अल्प प्रतिसाद दिसून आला असून देवस्थानच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे थर्मलगन द्वारे तापमान व ऑक्सिमिटरच्या सहाय्याने ऑक्सिजन लेव्हल तपासणी करण्यात येत असून दररोज मंदिर व मंदिर स्वच्छ करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक गोऱ्हे यांनी सांगितले.

--