शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या भूखंडांवर माफियांचा डोळा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

‘फ्लॅट’वरही ताबे : जागेसंदर्भातली वाढली गुन्हेगारी विवेक भुसे पुणे : उपनगरालगतच्या भागात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यातूनच काही ...

‘फ्लॅट’वरही ताबे : जागेसंदर्भातली वाढली गुन्हेगारी

विवेक भुसे

पुणे : उपनगरालगतच्या भागात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यातूनच काही दशकांपूर्वी घेतलेल्या भूखंडाला (प्लॉट) मोठा भाव आला आहे. असे भूखंड ‘लॅडमाफियां’कडून बळकाविण्याचे प्रकार वाढले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ७७ भूखंड हडपण्याचे गुन्हे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये घडले आहेत. याशिवाय भाडेकरूंशी संगनमत करून ज्येष्ठ नागरिकांच्या सदनिका (फ्लॅट) बळकाविण्याचेही प्रकार मोठ्या प्रमाणात शहरात घडत आहेत.

शहरात आता रिकामे भूखंड कमी राहिले आहेत. असे असले तरी भूखंड बळकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सन २०१९ मध्ये ३४ गुन्हे दाखल झाले. लॉकडाऊन असल्याने सन २०२० मध्ये ही संख्या घटून वीसवर आली. मात्र, यंदा पुन्हा अवघ्या सहा वर्षांतच भूखंड बळकावल्याचे २३ गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

शहराची हद्द दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात राहणे परवडत नसल्याने नागरिक दूरवर एक-दोन गुंठे जमीन घेऊन कालांतराने तेथे घर बांधण्याचे स्वप्न पाहात असतात. काही वर्षांपूर्वी गुंठेवारीने घेतलेली जागा पडून असते. शहर वाढत असल्याने त्यांच्या जागेची किंमत वाढत जाते. त्यातूनच ‘लँडमाफियां’चे लक्ष त्याकडे जाते. मूळ जमीनमालकाच्या नातू, पणतू किंवा अन्य नातेवाईकांना पुढे करून कुलमुखत्यारपत्र घेऊन जमिनीवर कब्जा केला जातो. त्यातून कायदेशीर अडचणी वाढतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी लाखो रुपयांची वसुली केली जाते. पैसे न दिल्यास सामान्य जमीनमालकाला प्रचंड मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. प्रसंगी शारीरिक इजाही पोहोचवली जाते.

पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले की, अनेक जण कच्च्या ले-आऊटमधील भूखंड घेतात. जमीन मालक एकापाठोपाठ एक भूखंड विकतात. त्यातून सात-बारामध्ये जमीन वजा होत जाते. भूखंड पाडताना रस्ता व इतर अ‍ॅमेनिटीसाठी जागाच ठेवली जात नाही. त्यातून जेव्हा ते विकसित करण्यास सुरुवात होते. त्यावेळी रस्ता व इतर अ‍ॅमेनिटीसाठी जागा सोडण्यावरून भूखंड मालकांमध्ये वाद सुरू होतात. अनेक जण केवळ खरेदीखत करतात. पण, त्याची नोंद ७ /१२ वर करून घेत नाही. त्यातून मग न्यायालयीन लढा सुरू होतो. त्याचा सर्वांनाच त्रास होतो.

अनेक जण भूखंड घेतल्याचे खरेदीखत करतात. त्यानंतर त्या जागेवर आपला हक्क कायदेशीररीत्या प्रस्थापित करण्यासाठी पुढे काही करत नाही. अशावेळी मग काही जण जुन्या ७/१२च्या आधारे तोच भूखंड दुसऱ्याला विकतात. त्यातून त्रास सुरू होतो. त्यासाठी भूखंड घेतल्यानंतर तातडीने ७/१२वर आपले नाव लावून घेणे महत्त्वाचे असते.

चौकट

भूखंड हडपल्याच्या तक्रारी

२०१९ - ३४

२०२० - २०

जून २१ अखेर - २३

चौकट

भूखंडाची मालकी राखण्यासाठी

-मंजूर ले आऊट, एनए झालेला अथवा टीपी स्कीम झालेलाच प्लॉट घ्या.

-विकत घेतलेल्या प्लॉटचे संरक्षण करण्यासाठी त्याला कुंपण घालावे.

-आपल्या जागेच्या मालकीबाबतचा बोर्ड त्या ठिकाणी लावावा.

-आपल्या जागेवर कागदोपत्रीही कोणी अतिक्रमण केले नाही ना, याची दर काही महिन्यांनी ऑनलाईन ७/१२ उतारा काढून तपासणी करावी.

चौकट

“मंजूर ले-आऊट असलेला एनए झालेला भूखंड खरेदी केल्यावर त्याचा तातडीने फेरफार करून त्याची नोंद ७/१२ वर करुन घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण कष्टाच्या पैशातून खरेदी केलेल्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून आपणच काळजी घेणे जरुरीचे आहे.”

-पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त.