शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षितला २०० रुपये दंड

By admin | Updated: September 12, 2014 12:26 IST

लक्ष्मी रस्त्यावर ‘नो-पार्किंग’ मध्ये मोटार लावल्याने प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला वाहतूक पोलिसांनी २०० रुपये दंड केला

पुणे : लक्ष्मी रस्त्यावर ‘नो-पार्किंग’ मध्ये मोटार लावल्याने प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला वाहतूक पोलिसांनी २०० रुपये दंड केला. लक्ष्मी रस्त्यावर मोटारी उभ्या करण्यास बंदी असतानाही एका कार्यक्रमा निमित्त आली होती. त्यावेळी माधुरीने आपली मोटार तेथे उभी केली होती. गुरुवारी सायंकाळी लक्ष्मी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आलिशान मोटारीमधून आलेली माधुरी कार्यक्रमासाठी दुकानामध्ये गेल्यानंतर मोटार (एमएच ०२, सीएल ६)‘नो-पार्किंग’मध्येच उभी करण्यात आली होती. काही वेळातच माधुरी दीक्षित दुकानामध्ये आल्याची बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे दुकानाच्या परिसरात गर्दी झाली होती. तसेच, काही काळ वाहतूककोंडीही झाली होती. साधारणपणे अर्धा ते पाऊणतास ही मोटार याच ठिकाणी उभी होती. वाहतूक पोलिसांच्या विश्रामबाग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन दंडाची पावती फाडली. नो-पार्किंगमध्ये मोटार उभी करणे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, अशा दोन कलमांखाली २०० रुपये दंड आकारण्यात आला. माधुरी दीक्षित-नेने आणि चालक करणसिंह गुरुदेवसिंग गील (रा. जुहू) यांच्या नावाने ही पावती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)