शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

मधुकर नलावडे यांना ‘फिदाभाई कुरेशी’ पुरस्कार प्रदान

By admin | Updated: May 8, 2017 03:21 IST

राष्ट्रीय व राज्यस्तरावर कबड्डीमध्ये खेळाडू आणि संघटक म्हणून आपला एक वेगळा दबदबा निर्माण करणारे फिदाभाई कुरेशी यांच्या नावाने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राष्ट्रीय व राज्यस्तरावर कबड्डीमध्ये खेळाडू आणि संघटक म्हणून आपला एक वेगळा दबदबा निर्माण करणारे फिदाभाई कुरेशी यांच्या नावाने जागृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार पुरस्कार यावर्षी कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष मधुकर नलावडे यांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते प्रदान केले.या वेळी मिसाळ म्हणाल्या, ‘‘ज्या व्यक्तींच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जात आहे त्या व्यक्तीमध्ये भयंकर जिद्द व चिकाटी होती. एखादे काम हाती घेतले, की ते पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नसे. त्यांच्या जाण्याने कबड्डी क्षेत्राची मोठी पोकळी भरून निघणार नाही. परंतु त्यांनी जी शिकवण दिली आहे त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा व चांगले खेळाडू, प्रशिक्षक व संघटक तयार व्हावे, यांची इच्छा कबड्डी आॅलिंपिकमध्ये जावी अशी होती. त्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’पुरस्कार्थी मधुकर नलावडे पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘‘आज जो काही मी आहे तो फक्त फिदाभार्इंमुळेच आहे. त्यांनी मला लढायला शिकवले. त्या महान व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे मी माझे भाग्यच समजतो. खेळाडूंनी चांगले खेळावे, व्यायाम करावा व निरोगी राहावे, असे फिदाभार्इंना नेहमीच वाटायचे. त्यामुळे आपण सर्वांनी काळाची गरज ओळखून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.’’ त्याप्रसंगी सृष्टी ताटे, सायली हणमघर, चैताली मसुरकर, लावण्या गवळी व मधुरा गायकवाड यांना रोख एक रुपये शिष्यवृत्ती व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अंजली मुळे, सिद्धी पोळ, जागृती सुरवसे, ऋतिका होनमाने यांना गुणवंत खेळाडू म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाबूराव चांदेरे यांनी भूषविले. या वेळी शांताराम जाधव, अजय खेडेकर, आरती कोंढरे, रघुनाथ गौडा, कमलताई व्यवहारे, संदेश जाधव, योगेश यादव, राजेंद्र आंदेकर पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला फिदाभार्इंचे कुटुंबीय, नलावडे परिवार, हितचिंतक, जागृती प्रतिष्ठानचे खेळाडू व पालक व सर्व कबड्डीचे जाणकार मंडळी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने सुनील वंजारी व वर्षा यादव यांनी केले. इम्रान शेख यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास ननावरे यांनी आभार मानले.