शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मावळात चोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: February 21, 2017 02:32 IST

मावळ तालुक्यात ठिकठिकाणी चोरट्यांचा धूमाकुळ सुरू असल्याच्या बातम्या येत असताना पोलीस या संदर्भात फारसे गंभीर

कामशेत : मावळ तालुक्यात ठिकठिकाणी चोरट्यांचा धूमाकुळ सुरू असल्याच्या बातम्या येत असताना पोलीस या संदर्भात फारसे गंभीर नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. अनेक गावांत चोऱ्या टाळण्यासाठी आणि चोरट्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी गस्त सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मावळात मोठ्या प्रमाणात चोर येत असल्याच्या, तसेच या चोरांच्या अंगावर काळे आॅईल लावले असल्याचे मेसेज व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत आहेत. यात कोणतेच तथ्य नाही असे पोलिसांकडून सांगितले जात असतानाच रविवारी कान्हे नायगाव, साई, वाऊंड, पारवडी या गावात चोर आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागात चोरांचा धुमाकूळ सुरु झाला असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात चोरी करणाऱ्या चोरांना वडगाव येथे व पवन मावळातील एका गावच्या हद्दीत दोन चोरांना पकडण्यात आले होते. मावळातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील गावांमध्येही चोऱ्या होऊ लागल्या असून याची पोलिसांना कोणतीच माहिती नाही, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. अनेक भागात चोर आल्याच्या घटनांमुळे गावातील तरुणांनी गस्त घालणे सुरू केले आहे. काही संशयित व्यक्ती आजूबाजूला आढळल्यास याची माहिती पोलिसांना दिली जाते. पण पोलीस येत नसल्याची तक्रार तरुण करीत आहेत. तर पोलीस संबंधित गावात जाऊन पोहोचल्यास तेथे कोणीच आढळत नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. काही दिवसांपासून लोणावळा परिसरात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. रोज कोठे ना कोठे चोरी झाल्याची बातमी येतच आहे. (वार्ताहर)पोलिसांचा उशीर : नागरिकांची नाराजी४मावळातील अनेक ठिकाणी चोरीच्या बहाण्याने काही चोर फिरत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धामधुमीत पोलीस आहेत. त्यामुळे माहिती कळवूनही पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी वेळ लागत आहे. मात्र, याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.