शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मासाळवाडीकरांचा बाणा

By admin | Updated: May 17, 2014 05:36 IST

पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या मासाळवाडी (ता. बारामती) या गावातील ग्रामस्थांनी मतदानाद्वारे आपला उद्रेक दाखवून दिला आहे.

बारामती : पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या मासाळवाडी (ता. बारामती) या गावातील ग्रामस्थांनी मतदानाद्वारे आपला उद्रेक दाखवून दिला आहे. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना या गावात १५ मते सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा जास्त मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचार संपल्यानंतर धमकावल्याच्या कथीत प्रकारानंतर या गावाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. दि. १६ एप्रिल २०१४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांनी मासाळवाडी गावात ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत गावातील एका तरुणाने पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, अशी थेट विचारणा केली होती. २००६ मध्ये आश्वासन दिले. २०१४ उजाडले तरी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आता नक्की तारीख द्या, पाणी कधी देणार. त्यावरून शाब्दिक वाद झाला होता. अजित पवार यांच्या कथीत धमकीची ‘व्हिडिओ क्लिप’ प्रसार माध्यमांनी उचलून धरली. सर्वच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मासाळवाडी गावात धाव घेतली. त्याचे वृत्तांकन केले. त्यानंतर गावात कोणी बोलू नये, यासाठी ग्रामदैवताचा गुलाल उचलायला लावायचा प्रकार घडला. त्यामुळे आठवडाभर मासाळवाडी गावातील ग्रामस्थ दहशतीच्या छायेत होते. या प्रकरणी न्यायालयात फिर्याद देण्यात आली आहे. अजित पवार यांनी आपण त्या गावात गेलोच नव्हतो, तर धमकी देण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा केला होता. मात्र, ग्रामस्थांनी पवार यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाच्या निवेदनात पवार गावात आले होते. मात्र, ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. धमकी दिलेली नाही, असा खुलासा ग्रामस्थांनी केला होता. या सर्व घडामोडीनंतर मासाळवाडी गावात झालेल्या मतदानाकडे लक्ष होते. प्रचाराच्या काळात या गावात जाता आले नाही, असे असताना देखील सुप्रिया सुळे पेक्षा जास्तच मते मिळतील, असा दावा महायुतीचे महादेव जानकर यांनी केला होता. त्यानुसार आज झालेल्या मतमोजणीत मासाळवाडी गावात सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा जानकर यांना १५ मते जादा मिळाली आहेत.