नवनाथ बबन शिंदे (रा. विश्वराज हॉस्पिटलसमोर, रेल्वे स्टेशन रोड, लोणी काळभोर), लखन रमेश झेंडे (रा. भीमगल्ली लहूजी चौक, रावणगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी बेकरी व्यवसाय करणाऱ्या अनराज महमद अन्सारी यांची भिगवण येथील सोलापूर-पुणे महामार्गावर अडवून करून दोगांनी दहा हजारांचा मोबाईल चोरून नेला होता. त्याबाबत अन्सारी यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र काहीही ठोस पुरावा नसताना फक्त दुचाकीच्या रंगावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करीत दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने, पोलीस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, विजय कांचन प्रमोद शिंदे, धीरज जाधव यांच्या पथकाने केली.