शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या प्रगतीपुस्तकांत आभास

By admin | Updated: July 27, 2015 03:43 IST

तब्बल आठ वर्षांपासून आघाडीचा राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते कारभार करीत आहेत. त्यानंतरही शहरातील मेट्रो, मोनोरेल, बीआरटी

पुणे : तब्बल आठ वर्षांपासून आघाडीचा राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते कारभार करीत आहेत. त्यानंतरही शहरातील मेट्रो, मोनोरेल, बीआरटी, ‘एचसीएमटीआर’ (अंतर्गत रिंगरोड), पीएमपीची बस खरेदी, पाणी पुरवठा, कचरा व मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प रखडलेले आहेत, अशी कबुली राष्ट्रवादीचे नेते दस्तुरखुद्द अजित पवार यांनी दिली. मात्र,बहुतेक प्रकल्पांचे खापर विद्यमान राज्य व केंद्र शासनावर फोडण्यात आले. त्याचवेळी शहरातील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सभागृह, दवाखाने व पाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारण्याची मांडणी करीत राष्ट्रवादीकडून तीन वर्षांच्या प्रगतीपुस्तकातून ‘विकासा’चा अभास निर्माण करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून आणि त्याअगोदरची पाच वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावाला २००९ मध्ये मान्यता देण्यात आली. त्यावेळी केंद्र व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. त्यानंतरही पाच वर्षांत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या १९८७ च्या विकास आराखडात ३४ किलोमीटरच्या ‘एससीएमटीआर’ या अंतर्गत रिंगरोड प्रस्तावित होता. गेल्या २० वर्षांपासून भूसंपादना अभावी प्रकल्प रखडला आहे. आळंदी व नगर रस्त्यावरील बीआरटीच्या वाहतुकीला अदयाप मुहूर्त मिळालेला नाही. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजने (जेएनएनयुआरएम) अंतर्गत निधी न मिळाल्याने पर्वती जलशुध्दीकरण केंद्राचा विस्तार रखडला आहे. मुख्य रस्त्यांचा विस्तार, उड्डाणपूल व रस्त्यांचे काँक्रेटीकरण करून वाहतूक प्रश्न व कोंडी सोडविण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीच्या प्रगतीपुस्तकातून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात वाहतूक कोंडी सोडविण्याचा एकही प्रकल्प पूर्ण झालेला नसल्याची वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादीने ५०० बस खरेदीचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात ‘जेएनएनयुआरएम’चा निधी न मिळाल्याने एकही बस नव्याने खरेदी करण्यात आलेली नाही. महत्वाचे प्रकल्प रखडलेले असताना ‘कालचक्र प्रगती’चे म्हणत राष्ट्रवादीने विकासाचा अभास निर्माण केल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)