शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत उडाण करिअर मार्गदर्शन व्याख्यान उद्या

By admin | Updated: April 26, 2015 01:24 IST

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? हा मोठा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या समोर उभा राहतो.

पुणे : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? हा मोठा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या समोर उभा राहतो. परंतु, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, नर्सिंग या नेहमीच्या अभ्यासक्रमांशिवाय आणखी कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन आपले करिअर उज्ज्वल करता येऊ शकते याबाबतचे योग्य मार्गदर्शन येत्या २७ एप्रिल रोजी ‘लोकमत उडाण करिअर मार्गदर्शन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना दिले जाणार आहे.लोकमत आणि मुंबई येथील नर्सी मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कोथरूड येथील मयूर कॉलनी परिसरातील बालशिक्षण मंदिरच्या एमईएस सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केवळ ग्रामीण भागातीलच नाही, तर शहरी भागातील विद्यार्थी व पालकांचा सुद्धा करिअर निवडताना गोंधळ उडतो. त्यामुळे बारावीमध्ये प्रवेश घेतलेल्या व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, सी.ए., पायलट, मेडिकल, फायनान्स, टुरिझम त्याचबरोबर नव्याने सुरू झालेल्या सॉफ्ट स्किल अभ्यासक्रमांविषयी व उद्योग क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविध रोजगारांविषयावर मुंबईचे प्रा. मनोज अनोकर, प्रा. योगेश कुलकर्णी आणि कॅप्टन अभिषेक मदिराला या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमता ओळखून योग्य करिअरची निवड करणे आवश्यक असते. बारावीनंतर विद्यार्थ्याच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते. त्यामुळे बारावीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याने योग्य करिअरची निवड करणे गरजेचे असते. त्यामुळेच ‘लोकमत’ने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. करिअर निवडण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, अशा पालक व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मिळणार आहेत. त्यामुळे पुणे शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा अधिकाधिक फायदा घ्यावा. हा कार्यक्रम विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य असून, अधिक माहितीसाठी ९९२१२७४७४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)बारावीची परीक्षा दिली, पुढे काय ?४इंजिनिअरिंग, मेडिकल की आयआयटी, कुठे प्रवेश घ्यावा, या प्रश्नांची योग्य उत्तरे जाणून घेण्याची संधी.४हुशार, सर्वसाधारण अशा सर्व विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन.