शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य महामंडळाची तारेवरची कसरत

By admin | Updated: November 10, 2015 01:38 IST

साहित्य संमेलनांना आलेले उत्सवी स्वरूप, साहित्यिकांपेक्षा राजकारणी व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यासपीठावरील गर्दी हे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते

पुणे : साहित्य संमेलनांना आलेले उत्सवी स्वरूप, साहित्यिकांपेक्षा राजकारणी व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यासपीठावरील गर्दी हे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते. संमेलन पार पाडण्यासाठी हितसंबंध जोपासण्याची वेळ आयोजकांवर येते. ८९व्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांनी सत्कार समारंभातच ‘अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही’, असा सज्जड दम दिल्याने साहित्य महामंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.साहित्य संमेलनांना उत्सवी स्वरूप आल्याचे साहित्य परिषदेनेही मान्य केले आहे. साहित्याचा उत्सव साजरा करण्यात काही हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे व्यासपीठावर राजकारणी व्यक्तींची होणारी गर्दी हासुद्धा दर वर्षी वादाचा विषय असतो. साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी व्यक्ती कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतो. राजकारण्यांच्या भाऊगर्दीमुळे व्यासपीठावरून साहित्यिक दूर सारले जातात, हे नेहमीचेच चित्र असते. पण, भविष्यात हे चित्र बदलेल, अशी आशा करायला काही हरकत नाही. पिंपरी येथे होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य श्रीपाल सबनीस निवडून आले आहेत. या निमित्त प्रथेप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिदषेने त्यांचा सत्कार केला. या सत्कार सोहळ्यात सबनीस यांनी कळीच्या मुद्द्यालाच हात घातला. संमेलनादरम्यान साहित्य संमेलनाध्यक्षांचा अवमान खपवून घेणार नाही, संमेलनाध्यक्षांचा अवमान म्हणजे महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेचा अवमान, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली आहे.या संदर्भात सबनीस यांनी काही संदर्भ दिले आहेत. ते म्हणाले, ‘‘घुमानच्या संमेलनात उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्षांना अंग चोरून उभे राहण्याची वेळ आली. ते बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांची खुर्ची इतरांनी बळकावली. संमेलनाचे अध्यक्षपद हे मानाचे आहे. अध्यक्षांचा मान राखलाच गेला पाहिजे. ही बाब कुणाच्या लक्षात आली की नाही हे माहीत नाही, पण एक जागरुक नागरिक म्हणून मी हा मुद्दा उपस्थित केला.’’सबनीस म्हणाले, ‘‘राजकारणी व्यक्तींनी व्यासपीठावर असू नये, असे मी म्हणत नाही. यशवंतरावांची परंपरा जपणाऱ्या राजकारणी व्यक्तींचे स्वागतच करू. संमेलनाध्यक्षांचा सन्मान राखणे ही महामंडळाचीच जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून परिषदेच्या घरगुती कार्यक्रमात व्यथा बोलून दाखविली.’’ (प्रतिनिधी)