शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

एकमेकांच्या मैत्रिणी बनत घेऊ गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समाजाच्या विविध क्षेत्रात बुद्धी, सौंदर्य, कर्तुत्त्वाच्या जोरावर स्वत:ची मोहोर उमटवणाऱ्या पुण्यातल्या यशस्वी महिला ‘लोकमत’च्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समाजाच्या विविध क्षेत्रात बुद्धी, सौंदर्य, कर्तुत्त्वाच्या जोरावर स्वत:ची मोहोर उमटवणाऱ्या पुण्यातल्या यशस्वी महिला ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आल्या होत्या. स्त्रियांनी चांगल्या मैत्रिणी बनत एकमेकांना सहकार्य करत राहावे आणि समाजात यशोगाथा निर्माण कराव्यात. नव्या युगातली स्त्री उन्मुक्त आकाशात गरुडझेप घेऊ इच्छिते. तिचा हा प्रवास न अडखळता व्हावा यासाठी चला एकत्र येऊ....आणि उंच झोका घेऊ, असाच निर्धार यावेळी सर्वांनी केला.

आपल्या कर्तुत्त्वाने विविध क्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या रणरागिणींचा जीवनप्रवास शब्दबद्ध केलेल्या ‘लोकमत वुमेन अचिव्हर्स’ या कॉफीटेबल बूकचे प्रकाशन बुधवारी (दि. २३) रोजी विमानतळ रस्त्यावरील हॉटेल रिट्झ कार्लटन येथे झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासदार अँड. वंदना चव्हाण, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, भारती हॉस्पिटल मेडिकल फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप-कदम आणि सुप्रिया पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेडचे सुशील जाधव, ‘नारायणी सिल्क’चे विशाल हिरेमठ, रोझरी ग्रुपचे विनय अरहाना, ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक निनाद देसाई यावेळी उपस्थित होते.

‘लोकमत वूमन अ‍ॅचिव्हर्स या कॉफी टेबल बुक’मध्ये कर्तुत्त्ववान महिलांचा जीवनपट उलगडला आहे. सामान्य ते असामान्य अशा प्रवासातील कार्यरत महिलांची दखल घेणारा, त्यांना सन्मान आणि अभिमान याची जाणीव देणारा हा सोहळा ठरला. खाचखळग्यांनी भरलेल्या वाटेवरुन आत्मविश्वासाने वाटचाल करत या सर्वांनी स्वत:चा मार्ग तयार केला. आज या कर्तृत्ववान महिलांची गगनभरारी अमर्यादित असून, इतरांना अचंबित करणारी आणि प्रेरणा देणारीही आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास, यशोगाथा निश्चितच अनेक धडपडणाऱ्या तरुणींना नकळत प्रेरणा देऊन जाईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.