शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला हक्काचे पाणी प्यायला द्या...!

By admin | Updated: May 7, 2017 01:45 IST

खाटिक गल्लीत पिण्यासाठी पाणी नाही, लाईट केव्हा येतात आणि केव्हा जातात, याचा ताळमेळ नसल्याने या भागातील रहिवाशांना

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : खाटिक गल्लीत पिण्यासाठी पाणी नाही, लाईट केव्हा येतात आणि केव्हा जातात, याचा ताळमेळ नसल्याने या भागातील रहिवाशांना विजेअभावी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. तेव्हा खाटिक गल्लीत महिलांना पाणी मिळालेच पाहिजे, अशी भावना नगमा मण्यार यांनी विद्युत महवितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत केला. मात्र, उपस्थित अधिकाऱ्यांनी विजेबाबत नियोजन सुरू आहे, असे सांगितल्यानंतर नागरिक शांत झाले.या वेळी महावितरण केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप भोळे म्हणाले, दौंडचा फिडर भारनियमनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील, परिणामी जनतेला भारनियमनाला सामोरे जावे लागणार नाही. सध्या सुरू असलेले भारनियमन हे वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे. त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही. भारनियमनमुक्त करण्यासाठी वीज ग्राहकांनीदेखील वेळीच वीजबिले भरून सहकार्य करावे. या वेळी शहर अभियंता एस. व्ही. डोंबाळे म्हणाले, की नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे भारनियमनाच्यासंदर्भात योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र खटी म्हणाले, की कुठल्याही परिस्थितीत भारनियमन झाले नाही पाहिजे. आज आम्ही संयम बाळगला आहे, मात्र पुढच्या आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाहीत. नगरसेवक इंद्रजित जगदाळे म्हणाले, की भारनियमनाला वेळ नाही. भारनियमनाची वेळ ठरवून द्यावी. या वेळी उपकार्यकारी अभियंता दिलीप ठोंबरे, संदीप रणदिवे, जीवन ठोंबरे, सोहेल खान, बाबा शेख, नागसेन धेंडे, हरेश ओझा, अनिल सोनवणे, संतोष जताप, रामेश्वर मंत्री, अशोक जगदाळे, सचिन कुलथे उपस्थित होते.कारवाई केली जाईलविद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत बहुतांशी नागरकिांचा अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल नकारात्मक सूर होता. महावितरणचे अधिकारी मोबाईल कट करतात, कार्यालयातील दूरध्वनी उचलत नाहीत. यापुढे जर कोणी वीज ग्राहकांचा मोबाईल कट केला तर कडक कारवाई केली जाईल, अशा सूचना महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीत दौंड तालुका अपंग संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर मंत्री म्हणाले, की जर वीजबिल थकले म्हणून भारनियमन करीत असेल ही बाब चुकीची आहे. बड्या व्यक्तींची तसेच शासकीय कार्यालयातील थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गरिबांचे वीज कनेक्शन थकबाकीमध्ये कट केले जाते, असा दुजाभाव करू नका. बड्या लोकांच्या थकीत वीजबिलांची यादी आम्हाला द्या. ती यादी अपंग संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करतो, की जेणेकरून याचा फायदा महावितरणला होईल.