शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

"बा... विठ्ठला" यंदा तरी आषाढी पायीवारी घडू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:10 IST

कोरोनाचे सावट : माऊलींचा प्रस्थान सोहळा अठ्ठेचाळीस दिवसांवर भानुदास पऱ्हाड आळंदी : कोरोना संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अठ्ठेचाळीस दिवसांवर ...

कोरोनाचे सावट : माऊलींचा प्रस्थान सोहळा अठ्ठेचाळीस दिवसांवर

भानुदास पऱ्हाड

आळंदी : कोरोना संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अठ्ठेचाळीस दिवसांवर येऊन ठेपलेला यंदाचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा लाखों वारकाऱ्यांसमवेत 'वैभवी' प्रस्थान ठेवणार का? किंवा मागील वर्षी प्रमाणे यंदाही मोजक्या वीस वारकऱ्यांसह बसने पंढरीला जाणार? या संभ्रमावस्थेत सर्व वारकरी मंडळी आहेत.

यंदा तुकोबांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे १ जुलैला देहूतून तर ज्ञानोबांच्या पालखीचे २ जुलैला आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू असून 'संचारबंदी' कायम आहे. तर सर्व धार्मिक स्थळेही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहेत.

मागील वर्षीही शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच संतांचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा रद्द केला होता. वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाच्या जबाबदारीवर प्रमुख निवडक संतांच्या चलपादुका मर्यादित वीस वारकाऱ्यांसमवेत बसने पंढरीला विठूचरणी नेण्यात आल्या होत्या. वास्तविक कोरोना हद्दपार करण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे वारकरी संप्रदायातील प्रत्येक घटकाने काटेकोर पालन करून आषाढीवारी घरीच राहून साजरी केली. त्यामुळे यंदातरी 'तुकोबा-माऊलीं'च्या सहवासातून पंढरीला जाण्याची वारकऱ्यांची मनोमन इच्छा आहे. मात्र यंदाही कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाकडून सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. परिणामी यंदाच्या पायीवारी सोहळ्यावरही कोरोनाचे सावट दिसून येत असले तरीसुद्धा "बा... विठ्ठला यंदा तरी पायीवारी घडू दे"! अशी विनवणी वारकाऱ्यांकडून केली जात आहे.

चौकट : दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला पंढरपुरात माउलींच्या पायीवारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम निश्चित केला जातो. मात्र मागील वर्षी प्रमाणे यंदाही पंढरीची चैत्र वारी रद्द केल्याने वारीपूर्व तयारी प्रलंबित आहे.

संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या भगवंत पांडूरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यातून विविध संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरीला जातात. विविध संतांचा प्रस्थान सोहळा जवळ आल्याने शासन सोहळ्याबाबत काय निर्णय घेईल? तसेच वारीचे नियोजन आणि स्वरूप कसे असेल? याकडे सर्व वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.

प्रस्थान तारखा...

१) संत मुक्ताई पालखी सोहळा : १४ जून

२) संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा : २४ जून

३) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा : १ जुलै

४) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : २ जुलै

५) संत सोपानकाका पालखी सोहळा : ६ जुलै

" यंदाच्या माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी गुरुवारी (दि.१३) वारी संबंधित सर्व घटकांसमवेत ऑनलाइन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्वांची मते जाणून वारीचे स्वरूप ठरवले जाईल.

- डॉ. अभय टिळक, प्रमुख विश्वस्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी

फोटो : श्री. ज्ञानेश्वर महाराज पायीवारी सोहळा. (संग्रहीत फोटो)